Jalgaon Crime News : येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर. एल. चौफुलीजवळ सागर हॉटेल येथे अनधिकृतरीत्या लॉजवर वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे आढळून आले. ( Bengali and Surat girls in Kuntankhana jalgaon crime news)
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या विशेष पथकाने इथे अचानक छापा टाकून पाच तरुणींसह ग्राहकांना ताब्यात घेतले. त्यात कोलकाता, पश्चिम बंगाल, सुरत येथील तरुणी आढळून आल्या आहेत.
जळगाव-अजिंठा रोडवरील आर. एल. चौकातून आत गेल्यावर सागर नावाच्या हॉटेलवर लॉजिंगच्या नावाखाली अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्री. गावीत यांना मिळाली होती. त्यांनी खास पथकाला नियुक्त करून माहिती संकलित करत खात्री झाल्यावर रविवारी (ता.३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला.
पोलिसांचा छापा पडताच, अनेकांनी पळ काढला असून लॉजमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पाच तरुणी पथकाला मिळून आल्या. तरुणींना ताब्यात घेत चौकशी केल्यावर या सर्व तरुणी परप्रांतीय असल्याचे व त्यांना वेश्या व्यवसायासाठी जळगावमध्ये आणल्याचे निष्पन्न झाले.
बनावट ग्राहकाद्वारे ‘रेड’
श्री. गावीत यांच्या पथकाने छापा टाकण्यापूर्वी बनावट ग्राहकास दीड हजार रुपयांच्या नोटा घेऊन पाठवले. बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे, रुमाल उंचावताच महिला पोलिसांसह अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
छाप्यात ताब्यात घेतलेल्या तरुणींमध्ये पश्चिम बंगाल, कोलकाता, सुरत (गुजरात) आदी ठिकाणच्या पाच तरुणींची ओळख पटली असून त्यांनी वेश्या व्यवसायाची कबुली दिली. हॉटेल व लॉज चालक सागर नारायण सोनवणे, श्याम विश्वास बोरसे या दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीत अड्डा
औद्योगिक वसाहत परिसरात ज्या ठिकाणी हॉटेल सागर आहे. त्या परिसरातील कारखानदार, उद्योजकांना नेहमीचा त्रास होता. मात्र हळूहळू संपूर्ण एमआयडीसीतील कारखान्यांमधील मजूर, ठेकेदारांचे इथे येणे-जाणे वाढल्याने मद्यपींकडून कामगारांना मारहाण, पैसे हिसकावण्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. काही उद्योजकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. श्री. गावीत यांच्या पथकाने रविवारच्या गर्दीचा दिवस असताना छापा टाकल्याने परिसरात एकच धावपळ उडाली.
असा चालायचा धंदा...
पथकाने छापा टाकल्यानंतर तरुणींची चौकशी करण्यात आली. हॉटेल चालक सोनवणे आणि बोरसेंना लॉजचा परवाना मागितला असता, दोघांकडेही नसल्याचे आढळले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर एका रांगेत दहा बाय दहाच्या ५ ते ६ खोल्या काढल्या आहेत. स्नानगृहाऐवजी आत मोरी आहे. एक खोली तरुणींच्या मेक-अपसाठी असून ग्राहक आल्यावर थेट बोलणे केल्यावर लॉज भाडे वेगळे देऊन खोल्यांचा वापर सुरू व्हायचा. लॉजवर रजिस्टरही असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.