जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) गटनेते भगत बालाणी यांनी दिलेला नगरसेवकपदाचा राजीनामा प्रशासन व नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.
त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले असताना, राजीनाम्याचे ते कुंभाड का रचत आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी केला आहे. (Bhagat Balani Resignation is Drama Allegation of former corporator Chetan Shirsale jalgaon news)
याबाबत प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे, की २०१८ मध्ये भगत बालाणी भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग १६ ‘अ’ ओबीसी राखीव गटातून निवडून आले. त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राला आपण छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायमूर्तींनी हे प्रकरण जातप्रमाणपत्र समितीकडे पाठवून चार महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष गुलाबराव खरात यांनी चौकशी करून सुनावणी घेत ७ नोव्हेंबर २०२२ ला त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले, तसेच समितीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्तांना भगत बालाणी यांनी खोट्या ओबीसी जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून घेतलेले लाभ ताबडतोब काढून घेण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
याबाबत कायदेशीर कारवाईचेही आदेश दिले होते. हा घटनाक्रम लक्षात घेता कारवाई टाळण्याच्या उद्देशाने त्यांनी हे राजीनामानाट्य रचल्याचे दिसत आहे. प्रशासनानेही सर्वसामान्य जनतेत विश्वास कायम राहावा, यासाठी त्यांचा खोटा राजीनामा स्वीकारण्याऐवजी प्रशासकीय कारवाई करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.