Jalgaon News : न्हावे (ता. चाळीसगाव) येथील पातोंडा रस्त्यावरील भवानी मातेच्या मंदिरातून सुमारे ३० ते ३५ किलो वजनाची पितळाची घंटा व सुमारे अडीच ते तीन फूट उंचीची समई चोरट्यांनी सोमवारी (ता. १२) रात्री लंपास केली.
चोरट्यांनी बंद घरांना सावज केल्यानंतर आपला मोर्चा मंदिराकडे वळविला आहे. न्हावे गावाजवळील पातोंडा रस्त्याला असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. (Bhavani Mate from Nhava brass bell for temple Theft by thieves Jalgaon News)
सध्या खरीप शेतीची लगबग सुरू असून, सर्व शेतकरी कुटुंब दिवसभर कामानिमित्त शेतात राबतात व रात्री गाढ झोपेत असतात.
चोरट्यांनी अशा प्रकारे गावात मोर्चा वळवला तर शेतीसाठी आणून ठेवलेला घरातील पैसा चोरीला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
या संदर्भात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे, या मंदिरातील चोरी झालेल्या पितळी घंटा व तीन फुटाची समई कोणत्याही दुकानावर मोड म्हणून विकत असताना चोरट्यांवर नजर ठेवून पोलिसांना चोर पकडण्यात यश येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.