Crime  sakal
जळगाव

Jalgaon Crime News : जोरात गाणे वाजविण्याच्या कारणावरून खून...! भिल्ल समाज आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील दाजीबानगरमधील अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ तालुक्यातील भिल्ल समाज एकवटला व आरोपींना आमच्यासमोर हजर करा, फाशी द्या, एनकाउंटर करा म्हणत तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. (Bhil community united road stop protest for 3 hours to protest murder of Akshay Bhil jalgaon crime news)

जोरात गाणे वाजविण्याच्या कारणावरून दाजीबानगर परिसरात दोन कुटुंबात वाद होऊन त्यातून एकाचा खून व एकाला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (ता.२४) रात्री घडली. अक्षय राजू भिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंगळवारी (ता. २५) सकाळी संतप्त भिल्ल समाज शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून व तालुक्यातून एकत्र येत तहसील कार्यालयाजवळ रस्ता रोको केला.

खुनातील आरोपींना आमच्यापुढे हजर करा म्हणत जमाव संतापला आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवत किरकोळ दगडफेक केली. घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव, प्रभारी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रभारी तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्यासह विविध अधिकारी व पोलिस कर्मचारी हजर झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सर्व संशयिताना अटक करण्यात आली आहे, असे सांगूनही जमाव ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर जमावाने महाराणा प्रताप चौकाचा ताबा घेत तिन्ही बाजूने वाहतूक बंद केली. तीन चार ठिकाणी टायर जाळण्यात आले.

विविध संघटना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलनकर्ते संशयिताना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्या कुटुंबाला आमच्या कॉलनीतून हाकलून द्या, अशीही मागणी केली. अखेरीस चार, पाच जणांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी संशयिताना अटक केल्याचे दाखविल्यानंतर व कठोर कारवाईचे निवेदन देऊन आंदोलन निवळले.

मुख्य धुळे रस्त्यावरची वाहतूक तीन तास बंद केल्याने सामान्य नागरिक व एसटी प्रवाशांचे हाल झाले. अतिक्रमणामुळे गावात जायला रस्तेच नसल्याने एसटी बस व मोठी वाहने लहान रस्त्याने जात होती. त्यामुळे एका एसटीला झाडाची फांदी लागून काच फुटला. वाहकाला दोषी धरण्यात आल्याने वाहक एसटी निमुळत्या रस्त्याने नेण्यास घाबरत होता. मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊनही लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत, ते बाजार समितीच्या प्रचारात व्यस्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT