murder esakal
जळगाव

Jalgaon News : ...थोडक्यात हुकले ‘खून का बदला खून’चे थरारनाट्य

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ येथील दोन टोळक्यांच्या वादात झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी अकरा महिन्यांनंतर सुटलेल्या तरुणाची नशिराबादला महामार्गाच्या पुलाखाली

गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली होती. (bhusawal case father had planned murder to take revenge for his son Police arrested him time jalgaon crime news)

डोळ्यांदेखत मुलाची हत्या झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी बापाने योजनाबद्ध खुनाचे नियोजन केले होते. न्यायालयाबाहेर दत्तमंदिराच्या ओट्यावर बुरखा घालून दबा धरून बसले असताना, पोलिसांनी वेळीच एकाला अटक केली.

झटापटीत दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, सोमवारी (ता. २०) न्यायालयीन परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भुसावळच्या ‘खून का बदला खून’ पॅटर्नची चर्चा सुरू झाली असून, पोलिस यंत्रणेसमोरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशी वाढली बदल्याची आग

भुसावळात लहान मुलांच्या भांडणातून दोन गट आपसांत भिडले होते. या घटनेनंतर धम्मप्रिय मनोहर सुरळकर, समीर ऊर्फ कल्लू अजय बांगर, शुभम पंडित खंडेराव, आशिष ऊर्फ गोलू अजय बांगर, अशा चौघांनी ११ ऑक्टोबर २०२० ला १७ वर्षीय कैफ शेख जाकीर याची डोक्यात रॉड घालून हत्या केली होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नंतरच्या खुनाची पार्श्वभूमी

या खुनाच्या गुन्ह्यात मुख्य संशयित धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय १८, रा. पंचशीलनगर) याला पोलिसांनी अटक केली. त्याची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ठीक अकरा महिन्यांनंतर २१ सप्टेंबर २०२१ ला धम्मप्रिय याला जिल्‍हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.

जामिनावर सुटल्यावर २२ सप्टेंबर २०२१ ला तो वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १९, एव्ही ९६५६) घरी भुसावळकडे जात होते. चौघेही नशिराबाद उड्डाणपुलाजवळ सुनसगाव रस्त्यावर एका टपरीवर थांबले असताना, तीन तरुणांनी दोघांवर पिस्तूल आणि चॉपरने हल्ला चढविला.

यात धम्मप्रिय याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर वडील मनोहर सुरळकर गंभीर जखमी झाले होते. नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

त्यापैकी दोन सध्या जामिनावर असून, शेख शमीर ऊर्फ समीर ऊर्फ भांजा शेख जाकीर (वय २१) आणि रेहानुद्दीन ऊर्फ भांजा रेहान नईमोद्दीन (वय २१) या दोघांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सोमवारी दुपारी दोनला त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रिय याचे वडील मनोहर सुरळकर याने त्याच्या मित्रासह रचला होता.

असा होता मास्टर प्लॅन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा धम्मप्रिय सुरळकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिता मनोहर सुरळकर याने त्याच्या मित्राच्या साथीने कट रचला. कारागृहातून सोमवारी समीर आणि रेहान या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात येणार होते.

अनेक दिवस जळगाव न्यायालयात पाळत ठेवून मनोहर याने बदल्याचे नियोजन आखले. काही दिवसांपूर्वीच त्याने दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि अतिरिक्त काडतूस खरेदी केले होते. कारागृहातून दोघांच्या तारखेची माहिती कळताच मनोहरने आखणी केली.

सोमवारचा थरार असा घडला

सोमवारी साधारण दुपारी अडीचच्या सुमारास जेलबंदी आणणारी गाडी येणार असल्याने दुपारी साडेबारापासून मनोहर आणि त्याचा मित्र रवी अशांनी बुरखा घालून कालीपिलीने भुसावळ ते जळगाव पोचून जिल्‍हा न्यायालयाचे पूर्वेकडील गेट गाठले. मोरोक्को हॉटेलसमोरच दत्तमंदिराच्या ओट्यावर दोघेही दबा धरून बसले होते.

पोलिसांनी उधळला कट...

काळा बुरखा परिधान केलेल्या महिला दत्तमंदिराच्या ओट्यावर बसून असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांसह टॅक्सी स्टॅण्डवरील चालकांचे लक्ष वेधले गेले. इतक्यात जमावाने दोघांना घेरले असतानाच वाहतूक पोलिस परमेश्वर जाधव आले.

लगेच निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, तेजस मराठे, नरेंद्र ठाकरे, गजानन बडगुजर, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर धडकले. जमाव आणि पोलिसांचा गराडा पाहताच दोघांची झडती घेतल्यावर एकाने गर्दीचा गैरफायदा घेत पळ काढला. पोलिसांनी बुरखाधारी मनोहर सुरळकर याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या पर्समध्ये गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस मिळून आले.

सिनेस्टाइल खुनाचा थरार टळला

जळगाव जिल्हा न्यायालयात आवारात होणारा मोठा गुन्हा रोखल्याने पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक किसनराव नजन पाटील तत्काळ पोलिस ठाण्यात पोचले.

घडल्या प्रकाराची हकिगत जाणून घेत पोलिस अधीक्षकांनी वाहतूक पोलिसांसह टीमचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांशी भेट घेत अशीच कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहितही केले. शहर पोलिसांत आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे तपास करीत आहेत.

आता खटल्याचे कामकाज ‘व्हीसी’द्वारे : पोलिस अधीक्षक

थोडक्यात मोठी घटना टळली असून, या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायालय आवारात सोमवारी साध्या वेशातील पोलिसांना तैनात केले आहेत. न्यायालयात कामकाजाला येणाऱ्या संशयितांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. पळून गेलेल्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT