Bhusawal Municipal Finance Commission Bank Account Seal jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ पालिका वित्त आयोगाचे बँक खाते ‘सील’; आरोग्य, इलेक्ट्रिकल विभागाचे व्यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एका खासगी लेआउटमधील मालक रस्त्याच्या प्रकरणात न्यायालयात गेले असता, न्यायालयाने नगरपालिकेला व शासनाला व्याजासह चार कोटी ५० लाख ३९ हजार ७८१ रुपये भरण्याचे आदेश दिलेले आहेत.

हे पैसे न भरल्याने नगरपरिषदेचे चौदावे व पंधरावे वित्त आयोगाचे बँक खाते महिनाभरापासून न्यायालयाच्या आदेशावरून सील करण्यात आले आहे.

यामुळे आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झाल्याने नगरपरिषद आरोग्य विभाग व इलेक्ट्रिकल विभाग अडचणीत आला आहे. (Bhusawal Municipal Finance Commission Bank Account Seal jalgaon news)

या प्रकरणी कंडारी शिवारातील सर्वे क्रमांक १९४/१ व १९६ या जमिनीबाबत अर्ज केला होता. यामध्ये ३६ भूखंड पाडण्यात आले होते. त्यात २४ मीटरच्या डीपी रोडसाठी १०३१ चौरस मीटर जागा दाखविण्यात आली आहे.

मात्र अंतर्गत रस्त्यासाठी ३१८५.५५ चौरस मीटर वापरण्यात आली आहे. जमीन अकृषिक झाली असून, अभिन्यासातील २४ मीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर दिशेला आहे. तो भुसावळ शहराचा २४ मीटर डीपी रोड आहे.

या विरोधात देवेंद्र यावलकर व इतरांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०१३ला डीपी रोडसाठी १० रुपये प्रति चौरस मीटर, ३०० प्रति चौरस मीटर रुपये देण्याचे आदेश केले होते. न्यायालयाच्या आदेशाविरोधात नगरपरिषदेने रीट याचिका दाखल केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवेंद्र रामचंद्र यावलकर हे एका खासगी लेआउटमधील रस्त्याच्या प्रकरणात न्यायालयात गेले असता न्यायालयाने पालिका व शासनाला व्याजासह चार कोटी पन्नास लाख रुपये तीस हजार ७८१ रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

ही रक्कम न्यायालयात भरली गेली नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून २१ ऑगस्टला पालिकेचे चौदावे व पंधरावे वित्त आयोगाचे बँकेचे खाते सीलबंद करण्यात आले आहे. यामुळे पालिकेचे आरोग्य विभाग व इलेक्ट्रिकल (स्ट्रीट लाईट) हे दोघे विभाग अडचणीत आले आहेत.

टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याचे आदेश

या प्रकरणात भुसावळ न्यायालयाने चार कोटी पन्नास लाख तीस हजार ७८१ रुपये व्याजासह रक्कमेपैकी एक कोटी वीस लाख रुपये हे पालिकेला द्यायचे असून, उर्वरित रक्कम राज्य शासनाला भरावयाची आहे. याप्रकरणी न्यायालयाने भुसावळ पालिकेला टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याचे आदेश पारित केले आहेत.

"शहराच्या दृष्टीने आरोग्य विभाग महत्त्वाचा असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी भुसावळ पालिका सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या प्रकरणी लवकरच ‘स्टे ऑर्डर’ घेऊन येणार आहे." -महेश वाघमोडे, मुख्याधिकारी, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT