जळगाव

पोलिसांचे सलग पाच तास ‘कोम्बिंग ऑपरेशन’..सहा गुन्हेगारांना अटक

तडीपार करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्हेगारांना तपासण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : लॉकडाउनच्या (lockdown) काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस (police) प्रशासन गुन्हेगारांवर नियंत्रण ठेऊन आहेत. त्या दृष्टीने शहरात कोंम्बिंग ऑपरेशन (Combing operation) राबविण्यात सहा गुन्हेगारांना अटक (criminals arrested) करण्यात आली आहे तर १४ हिस्ट्री शिटरची तपासणी करण्यात येऊन त्यांना समज देण्यात आली.

(bhusawal police combing operation six criminals arrested)

भुसावळ शहरात, बाजारपेठ पोलिस ठाणे त्याचप्रमाणे शहर पोलिस ठाणे हद्दीमध्ये शुक्रवारी (ता. २१) रात्री अकरा ते शनिवारी (ता. २२) पहाटे पाचपर्यंत पाच तास कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी, रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर तपासणे करणे, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगारांचा ठाव घेणे, तसेच गुन्हेगारांवर निगराणी ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने हे कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक दुनगुहू, पोलिस मुख्यालय येथील एक आरसीपी पथक यांनी केली.

गुन्हेगारांची झाडाझडती
यात विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना ‘वॉन्टेड’ असणारे १८ गुन्हेगार तपासले. त्यापैकी तीन आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले. रात्रीच्या वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने व संशयितरित्या फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तडीपार करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्हेगारांना तपासण्यात आले. ते घरी मिळून आले नाही. एकूण १४ हिस्ट्री सीटर तपासून त्यांना चांगल्या वागणुकीची समज देण्यात आली. एका हॉटेलवर रात्री उशिरा सुरू ठेवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण नऊ कारागृहातून सुटलेल्या संशयितांचा ठाव घेण्यात आला. त्यापैकी तीन जणांवर प्रतिबंधक कारवाई केलेली नसल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT