जळगाव : भुसावळ (Bhusawal) रेल्वे मंडल वाणिज्य विभागाला फेब्रुवारीत १३२ कोटी सात लाखांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये ११४ कोटी ८१ लाख होता. मागील वर्षापेक्षा यंदा १५.३ टक्क्यांनी अधिकचा महसूल असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. (Bhusawal Railway Division Commerce Department has received revenue of 132 crore 7 lakhs in February jalgaon news)
मेल एक्स्प्रेस/पॅसेंजर ट्रेनमधून फेब्रुवारी २०२२ मध्ये ४९ कोटी ४२ लाख उत्पन्न मिळाले. यंदा फेब्रुवारी २०२३ मध्ये ६६ कोटी सहा लाख म्हणजे मागील वर्षापेक्षा ३३.६७ टक्के अधिकचे उत्पन्न आहे. मालगाडीतून विविध वस्तूंची ने-आण करण्यातून फेब्रुवारी २०२२ मध्ये ५१ कोटी ४१ लाख उत्पन्न होते.
यंदा फेब्रुवारी २०२३ मध्ये ५८ कोटी ४४ लाख उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत १३.६७ टक्के जास्त आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये तिकीट तपासणीचा महसूल चार कोटी ८० लाख आहे. पार्किंगचे उत्पन्न फेब्रुवारी २०२२ मध्ये ५.१५ लाख होते.
फेब्रुवारी २०२३ मध्ये २२.९७ लाख आहे. गेल्या वर्षापेक्षा ३४६.०२ टक्के जास्त आहे. वाणिज्य प्रसिद्धी, जाहिरातीतून फेब्रुवारी २०२३ मध्ये ३० लाख ८४ हजार उत्पन्न मिळाले. खानपान विभागातून फेब्रुवारी २०२३ मध्ये ९४.९१ लाख मिळाले. म्हणजे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपेक्षा ८८.३१ टक्के जास्त आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
प्रवाशांसाठी सुविधा...
- शिरसोली स्थानकावर १६ फेब्रुवारीपासून तिकीट बुकिंग एजंट
- अकोला स्थानकावर १० फेब्रुवारीपासून वातानुकूलित वेटिंग रूम, त्याद्वारे प्रतिवर्ष तीन लाख फी मिळेल
- नाशिक रोड स्थानकावर १० फेब्रुवारीपासून वातानुकूलित वेटिंग रूम, त्याद्वारे प्रतिवर्ष ८.१५ लाख फी मिळेल
- चाळीसगाव स्थानकावर १२ फेब्रुवारी माल गुदाम, दोन-चारचाकी पार्किंग
- भुसावळला उत्तर बाजूला तीन वर्षांसाठी चारचाकी पार्किंगचा ठेका, त्याद्वारे ५.५६ लाख मिळतील
- अकोला स्थानकावर एक लिफ्ट, अमरावतीला दोन लिफ्ट आणि मनमाडला एक लिफ्ट सुरू
- भुसावळ स्थानकावर स्मॉल मल्टिपल युनिट स्टॉल
- शेगाव स्थानकावर १३ फेब्रुवारीला पे ॲन्ड यूज व क्लॉक रूमचा ठेका, त्याद्वारे २.६८ लाख उत्पन्न मिळेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.