potholes ( file photo ) esakal
जळगाव

Jalgaon News : शाहूनगरमधील पिंप्राळा पुलाजवळ ‘मौत का कुआ’; रस्त्यावर मोठे खड्डे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शाहूनगरमधील पिंप्राळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तयार होत असलेल्या नवीन पुलाच्याजवळ रस्ता खराब झाला आहे. जीव तळहातावर घेऊन वाहनधारकांना वाहन चालवावे लागते.

या रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.(Big potholes on road near Pimprala bridge in Shahunagar jalgaon news)

महापालिकेने गोविंदा रिक्षा थांब्यापासून शाहू नगरमधील जुन्या उर्दू शाळेपर्यंत रस्त्याचे काम चांगले केले. उर्दू शाळेपासून पिंप्राळ्याच्या तयार होत असलेल्या नवीन पुलापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नाही. सध्यस्थितीत हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे आता जिकिरीचे झाले आहे.

त्यातच खड्डे पडलेल्या ठिकाणी पाइपलाइनची गळती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील खड्यात पाण्याचा डोह झाला आहे. याठिकाणी किरकोळ अपघात दररोज होत आहेत. अनेक वाहनधारक याठिकाणी पडले आहेत.

त्यांना किरकोळ मार लागला आहे. मात्र याठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री रस्त्यावरून जाणे धोकादायक आहे. वीज गेल्यानंतर वाहनधारकांची कसोटी असते.

रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्‍नचिन्ह

गोविंदा रिक्षा थांबा ते जुन्या उर्दू शाळेपर्यंत रस्त्याच्या पुढे नवीन पिंप्राळा पुलापर्यंत रस्त्याचे काम का केले जात नाही? हा प्रश्‍न जळगावकरांना भेडसावत आहे. एवढ्या भागातील रस्त्याचे काम न करण्याचे गौडबंगाल काय? हे प्रश्‍नचिन्ह काय आहे.

महापालिका रस्त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा मागणी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त लक्ष देणार का?

महापालिकेत सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे पदभार आहे. त्यांच्याकडून जनतेच्या विकासकामांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र रस्त्याची कामे होत नसल्याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्तांनी आता प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यास, त्यांना रस्त्याची गंभीर स्थिती लक्षात येईल व त्या तातडीने काम करण्याबाबत आदेश देतील, असे जळगावकरांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT