Accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : भऊरजवळ डिव्हायडरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : भऊरकडून मेहुणबारे गावाकडे येत असताना जामदा ते भऊर दरम्यान भराडी नाल्याजवळील वळणाच्या पुढे असलेल्या ‘डिव्हायडर’ला दुचाकी धडकून तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) दुपारी घडली. अविनाश पिरचंद चव्हाण (वय ३५, रा. नवेगाव, मेहुणबारे) असे मृत तरूणाचे नाव आहे.(Bike rider dies after hitting divider near Bhaur jalgaon accident news)

अविनाश चव्हाण हा तरुण शुक्रवारी (ता. ८) दुपारी आपल्या दुचाकीने (क्रमांक- एम.एच. १९ डीसी ७१५१) जामदा गावाकडून मेहुणबारेकडे येत होता. एरंडोल- येवला रस्त्यावरील भऊर ते जामदा दरम्यान असलेल्या भराडी नाल्याजवळील वळणाच्या पुढे रस्‍त्याच्या डिव्हायडरला त्याच्या दुचाकीची धडक लागली.

त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, एरंडोल- येवला महामार्गवरील भऊर ते जामदा दरम्यान असलेला वळण रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. या वळणावर सहा महिन्यात तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज येथील अविनाश चव्हाण या तरुणालाही आपले प्राण गमवावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT