In the photograph, Chatak Nature Conservancy Chairman Anil Mahajan, Sameer Neve, Muktainagar Forest Range Officer Sachin Thackeray, Forester D. G. Pachpande etc. esakal
जळगाव

Jalgaon : अमेरीका, इस्त्राईल व युरोपातुनही पक्षी अभ्यासकांची हतनूर जलाशयास भेट

सकाळ वृत्तसेवा

तांदलवाडी (ता. रावेर) : खानदेशातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात विदेशी पक्षी सैबेरिया, मंगोलिया, तिबेट, चीन, युरोप, रशिया, पाकिस्तान, तसेच उत्तर भारतातून स्थलांतर करून येतात पक्षीसप्ताहादरम्यान या जलाशयावर १२३ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

चातक निसर्गसंवर्धन संस्थेतर्फे पक्षीसप्ताहानिमित्त झालेल्या पक्षीगणनेत ही बाब समोर आली आहे. या वर्षी पक्षीसप्ताहादरम्यान प्रथमच इस्त्राईल, अमेरिका, युरोपातूनही विदेशी पक्षी अभ्यासकांनी हतनूर जलाशयाला भेट दिली. राज्यासह देशातील पक्षीतज्ज्ञ व पक्षी अभ्यासकांचीही जलाशयावर पक्षी निरीक्षणासाठी गर्दी होत असते.

हतनूर जलाशयावर दलदलीचा भाग, पाणथळ जमीन, विपुल प्रमाणात अन्न असलेली बेटे व पोषक वातावरणामुळे ऑक्टोबर ते मार्चदरम्यान हजारोंच्या संख्येने विदेशी पक्षी स्थलांतर करून येत असतात. ‘हतनूर’सह तांदलवाडी, मांगलवाडी, मेहूण, चिंचोल, चांगदेव व टहाकळी परिसरातूनही पक्षीमित्र वेगवेगळ्या पक्षी प्रजातींची नोंद घेत आहेत. (Bird watcher from America Israel and Europe also visit Hatnur Reservoir Jalgaon News)

जलाशयावर बोटींचा वापर करून दुर्बिणी, कॅमेरासह अत्याधुनिक साधनांसह पक्षीप्रेमी पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटत आहेत. काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोकाग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या दुर्मिळ प्रजातीही या ठिकाणी आढळून येतात. त्यांच्या संवर्धनासाठी या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

पक्षीप्रेमींकडून विविध उपक्रम

५ ते १२ नोव्हेंबर पक्षीसप्ताहदरम्यान स्थानिक पक्षी, तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, पक्षी निरीक्षण व अभ्यास, पक्ष्यांविषयी माहितीपत्र, माहिती पुस्तक प्रकाशित करून जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, पक्षी छायाचित्रण प्रदर्शन, कार्यशाळा, पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व आदी उपक्रम घेण्यात आले.

विदेशी पक्ष्यांची हजेरी

वैष्णव, गढवाल, लालसरी, थापाट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, तलवार बदक, चांदवा, नयनसरी, रंगीत करकोचा या पक्ष्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वारकरी, चमचा, हेरॉन, हळद्या, खंड्या या भारतीय पक्ष्यांचाही समावेश आहे.

धोकाग्रस्त दुर्मिळ प्रजाती

जलाशयावर काही आंतरराष्ट्रीय धोकाग्रस्त स्तरावर दुर्मिळ प्रजातीही या ठिकाणी आढळून आल्या. त्यात पांढरा शराटी, रंगीत करकोचा, नदीसुराय, लालसरी, रेड फॉलोरफ आदी पाणपक्षी आढळून आले.

या पक्षीप्रेमींची हजेरी

उपवन संरक्षक भारत शिंदे, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, चातक निसर्गसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पक्षीअभ्यासक अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, समीर नेवे, संजय पाटील, प्रशांत पाटील, वनपाल डी. जी. पाचपांडे, वनरक्षक एन. पी. जाधव, विलास काळे, संदीप चौधरी, रूपाली शिर्के, तुळशीराम घरजाळे, नबाब पिंजारी, राजेश सोनवणे, विनोद थाटे, तुषार भोळे, सुनील चिंचोले आदी.

"हतनूर जलाशय हे जैवविविधतेच्या दृष्टीने नटलेला परिसर असून, पक्षी सप्ताहदरम्यान दररोज विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथे दरवर्षी नवनवीन पक्षी प्रजातींचा शोध लागत असून, दुर्मिळ व धोकाग्रस्त झालेले पक्षीही आढळून आले."

- अनिल महाजन , पक्षीअभ्यासक व अध्यक्ष, चातक निसर्गसंवर्धन संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT