Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. या उष्णतेने पशु-पक्षी अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात. या पार्श्वभूमीवर येथील मंगळग्रह सेवा संस्थेने बाराही महिने पक्ष्यांच्या पाणी आणि खाद्याची सोय केली आहे. (Birds which are not easily seen now live in mangal graha temple premises jalgaon news)
सर्व प्रकारचे धान्य व पक्ष्यांना आवडणारी फळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. परिणामी, उन्हाळ्यात सहजासहजी कोठेही न दिसणारे पक्षी आता मंदिर परिसरात रहिवास करू लागले आहेत.
मंदिर परिसरात भरपूर झाडे आहेत. झाडांवर मंदिर व्यवस्थापनाने मडकी बांधलेली आहेत. या मडक्यांमध्ये पक्षी अंडी घालतात आणि प्रोजोत्पादन करतात. पक्ष्यांसाठी सर्वत्र सुरक्षितता आहे. त्यामुळे पक्ष्यांना कोणतेही प्रकारची इजा पोहोचत नाही.
फळझाडांना पक्षांव्यतिरिक्त कोणीही हात लावत नाही. त्यामुळे पक्ष्यांची सुमधुर किलबिल मंदिरात ऐकावयास मिळते. त्यामुळे मंगळग्रह मंदिर पक्ष्यांसाठीही मोठे आकर्षक व विसाव्याचे ठिकाण ठरवू लागले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संगोपनासाठी जनजागृती
पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी मंगळग्रह सेवा संस्था केवळ स्वतःच प्रयत्न करीत नाही तर ते यासंदर्भात सोशल मीडिया, माहिती पुस्तक व डिजिटल माध्यमांद्वारे सतत व्यापक जनजागृती करीत आहेत.
त्याचा परिणाम म्हणून अनेक पक्षीप्रेमी भाविक तथा पर्यटक मंदिर व्यवस्थापनाला येऊन भेटतात, पक्ष्यांना काय खाद्य द्यावे, कसे खाऊ घालावे, त्यांच्यासाठी पाणी कुठे व कसे ठेवावे, पक्ष्यांनी अंडी घालून प्रजोत्पादन करावे म्हणून काय केले पाहिजे? या संदर्भात देखील मंदिर प्रशासनाकडून पक्षीप्रेमींना माहिती दिली जाते.
...या पक्ष्यांचे आहे वास्तव्य
दयाळ, पांढऱ्या छातीची गानकोकिळा, बुलबुल, सातभाई, कोतवाल, राखी वटवट्या, भारतीय दयाळ, कवडी मैना, वंचक, पांढऱ्या छातीची खंड्या, सूर्यपक्षी, भांगवाडी मैना, कोकिळा, पोपट याशिवाय असंख्य चिमण्या, कावळे, कबूतर असे काही पक्षी आहेत. ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, अशाही अनेक पक्ष्यांच्या जाती या मंदिरात आढळून येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.