जळगाव - ‘‘आपल्या वाहनात ड्रग टाकायचा, ते पकडायचा आणि आपल्याला ड्रग माफिया म्हणून घोषित करून तुरूंगात टाकायचे, असे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला लाजवेल, असे षडयंत्र आपल्याविरुद्ध करण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याचा तपास चौकशी आता ‘सीबीआय’कडे दिली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसून येईल, असा दावा माजी मंत्री व भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
महाजन म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार असताना चंद्रशेखर बावनकुळे तसेच अनेक भाजप नेत्यांना षडयंत्र करून फसविण्याचा हा डाव होता. मला तर ‘ड्रग माफिया’ दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता. माझ्या विरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता.
याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले. यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता. मात्र तो सर्व रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला. हे प्रकरण चौकशीसाठी ‘सीबीआय’कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती.
मात्र महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, आता आमचे सरकार आले आहे, आम्ही ही सर्व चौकशी ‘सीबीआय’कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.