Black Sorghum Dharangaon Buy coarse grains Farmers sakal
जळगाव

जळगाव : काळी ज्वारी खरेदी करा हो!

धरणगाव भरडधान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा टाहो

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : यंदा अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास गेला. पावसामुळे काही शेतमाल काळपट झाला आहे. असे असताना शेतकरी पांढरी शुभ्र ज्वारी आणतील कोठून, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. निसर्गाची साथ नाही, शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, यंत्रणा शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा भावना व्यक्त करीत काही शेतकऱ्यांनी काळी ज्वारी खरेदी करा हो, असे म्हणत टाहो फोडला.

येथील बाजार समिती आवारात शासकीय खरीप भरडधान्य खरेदीस सोमवारी (ता. २०) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून प्रारंभ झाला. अण्णासाहेब साहेबराव पाटील सहकारी फ्रूट सेल सोसायटी, पाळधी ही संस्था शासन आदेशान्वये खरेदी करीत आहे. मात्र या खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचा जुना माल खरेदी केला जात असून, नवीन ज्वारी खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. दोन दिवस या केंद्रावर काळी, पांढरी, जुनी, नवी ज्वारी खरेदी झाली. मात्र, बुधवारी (ता. २२) दुपारपासून काळी ज्वारी म्हणून खरेदी बंद करण्यात आली.

डीएमओ मगरे बुधवारी दुपारी येथील खरेदी केंद्रावर आले आणि एका शेतकऱ्याचा काळ्या ज्वारीचा नमुना घेऊन गेले. त्याच वेळी काळी ज्वारी खरेदी करू नये, असा आदेश दिला. मात्र, यापूर्वी दोन दिवस खरेदी केलेल्या ज्वाचे काय, याचे उत्तर श्री. मगरे यांना शेतकऱ्यांना देता आले नाही. दोन दिवसांत व्यापारी आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या लोकांची ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांकडून पांढरी ज्वारी, जिच्यातून अक्षरशः पीठ पडत होते, अशी घेतली. शेतकऱ्यांना मेसेज करून बोलविले आहे. काळी ज्वारी आणू नये, अशी सूचना देणे अपेक्षित होते. बाजार समितीत भाड्याचे ट्रॅक्टर करून आणलेली ज्वारी परत नेताना शेतकरी रडकुंडीला आले होते. शेतकऱ्यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची भेट घेतली. मात्र, श्री. देवरे यांनी आमचे काम खरेदी केंद्र सुरू करणे आणि गुदाम उपलब्ध करून देणे एव्हढेच काम आहे, असे सांगितले. अशा वेळी शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने आणलेले धान्य सरसकट खरेदी करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. अतिवृष्टी आणि खरीप हंगामात पांढरी ज्वारी आणायची कशी? पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची पिळवणूक

व्यापारी शेतकऱ्यांकडून सात-बारा उतारे जमा करून घेतात आणि शेतकऱ्यांच्या नावावर माल विकला जातो. व्यापारी अप्रत्यक्ष आपले काम करीत असतात. शेतकऱ्यांची शासन आणि व्यापारी दोघांकडून पिळवणूक होत आहे.

"साधारणपणे अतिशय निकृष्ट दर्जाची ज्वारी असेल तर ती खरेदी करता येत नाही. मात्र, मालाची प्रत ठरविण्याची जबाबदारी बाजार समिती आणि ग्रेडर यांची असते. जिल्ह्याच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांनी भेट देऊन काळी ज्वारी खरेदी बंद करण्याचे आदेश खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दिले आहेत."

-नितीनकुमार देवरे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT