Jalgaon News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे बाळांची अदलाबदल झाल्याच्या गैरसमज प्रकरणावर मंगळवारी (ता. २३) रात्री पडदा पडला.
दोन्ही बाळ अखेर त्यांच्या मूळ मातांच्या कुशीत विसावली. दोन्ही माता भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. (Both babies rested in arms of their mothers jalgaon news)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २ मेस दोन महिला सिजरसाठी आल्या होत्या. दोन्ही मातांची बाळ गैरसमजुतीमुळे एकमेकांना देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून ती बाळ मूळ मातांना दिली. मात्र, बाळांचे पालक समाधानी नव्हते.
त्यांनी डीएनए चाचणीची मागणी केली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोन्ही माता आणि बाळांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल प्रलंबित होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बहुप्रतिक्षित अहवाल मंगळवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता व बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तत्काळ बाळ मूळ मातांना सोपविण्याचा निर्णय घेतला.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे हवालदार नरेंद्र दिवेकर व रुग्णालय प्रशासनाच्या उपस्थितीत दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाइकांसह बोलविले. प्रभारी अधिष्ठाता डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला.
अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी, तर प्रतिभा प्रवीण भिल यांना मुलगा झाल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही मातांना त्यांची बाळ सुपूर्द करण्यात आले. उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. संजय बनसोडे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. अतुल गाजरे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. विनेश पावरा, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. संजीवनी अनेराय, परिचारिका पूजा आहुजा, चारूशीला पाटील उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.