Engineer arrested while accepting bribe of 20 thousand in Shahada nandurbar news esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : साडेनऊ लाखांच्या कामासाठी लाखाची लाच; अभियंत्याविरुद्ध चौकशीअंती गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : सर्वच कार्यालयांमध्ये विकासकाम असो की कुठलेही कंत्राट... लाचखोरीचे दर ठरलेलेच आहेत. न बोलता- न मागता कंत्राटदार स्वतःहून ही रक्कम टेबलाखालून देतोच देतो. त्यात कमी-अधिक झाल्यावर मात्र, अडचण होऊन बसते. असाच काहीसा प्रकार ‘महावितरण’च्या स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी घडवून आणला आहे.

वॉल कंपाउंड बोअरिंगच्या नऊ लाख ६५ हजार ३७१ रुपयांच्या कामासाठी एक लाख रुपयांची अपेक्षा असलेल्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे यांचे सहाय्यक भालेराव उर्वरित ४० हजारांतून स्वतःचे २० हजार मागत असल्याने त्रासलेल्या कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली. ( bribe taken by mahavitaran engineer of one lakh for work worth nine and half lakhs jalgaon news)

जळगाव येथील रहिवासी तक्रारदार शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी महावितरण स्थापत्य विभागाच्या जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील सब-डिव्हिजन कार्यालयाच्या वाल कंपाउंडसह बोअरिंग करण्याच्या कामाचा कंत्राट मिळविला होता.

या कामाची स्थापत्य कार्यकारी अभियंता नाईकवाडे यांनी साईट व्हिजिट केली होती. तसेच, हे काम बरोबर नसून, मुदतीत पूर्ण केले नाही, असा शेरा मारून त्यांनी कंत्राटदारास नोटीस बजावली होती.

कंत्राटदार यांनी महावितरण कार्यालयात जाऊन नाईकवाडे यांची वेळोवेळी भेट घेतली. नऊ लाख ६५ हजार ३७१ रुपये मूल्याचे हे काम सुरळीत राहू द्यायचे असेल तर त्यासाठी कामाच्या मोबदल्यात दहा टक्के याप्रमाणे एक लाख रुपयांची मागणी नाईकवाडे यांच्याकडून करण्यात आली.

ऐन बिल निघण्याच्या वेळेस काम बंद पडून नुकसान होऊ नये म्हणून तक्रारदाराने नाइलाजास्तव लाच म्हणून नाईकवाडे यांना ६० हजार रुपये दिले. त्यानंतरही उर्वरित ४० हजारांसाठी तक्रारदारास त्रास दिला जात होता.

त्रस्त कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत रीतसर तक्रार दिली. या तक्रारीची विभागाने पळताळणी करून ठरल्याप्रमाणे १२ जूनला तक्रारदारास परत लाचेची बोलणी करण्यासाठी महावितरण कार्यालयात रवाना करण्यात आले. मात्र, त्या दिवशी कार्यकारी अभियंता नाईकवाडे हजर नव्हते. त्यांचे सहाय्यक इंजिनिअर भालेराव यांची तक्रारदाराने भेट घेतली.

नाईकवाडे हजर नसल्याने त्यांचे कंत्राटदार आणि भालेराव यांच्यात भादली येथील कामाविषयी चर्चा झाली. चर्चेदरम्यान भालेराव यांनी नाईकवाडे यांच्यासाठी २० हजार रुपये आणि स्वत:साठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात असिस्टंट इंजिनिअर भालेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक एन. एन. जाधव तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT