जळगाव : ममुराबाद (ता.जळगाव) येथे तेरा वर्षीय बालकाचा अंघोळ करतांना विद्युत हिटरचा शॉक लागल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. घरात चुलतबहिणीच्या लग्नाची धामधुम सुरु असतांनाच प्रणव मुकूंदा पाटील (वय १३) याचा स्नान घरातच मृत्यु झाल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून ग्रामस्थ सुन्न झाले. तालुका पोलिसांत या प्रकरणी आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ममुराबाद (ता. जळगाव) येथे मुकूंदा दामू पाटील पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. आज रविवार (ता. १७) रोजी मुकूंदा पाटील त्यांची पत्नी दिपाली असे दोघेजण लग्नघरी (भावाकडे) गेले होते. आईवडील सकाळीच घरातून भावाकडे निघुन गेल्याने मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. ताईच्या लग्नासाठी जायचे असल्याने प्रणव अंघोळीसाठी बाथरुम मध्ये गेला. तेथेच अंघोळ करतांना त्याला बादलीतील हिटरचा जबरदस्त विद्युत झटका लागून जागीच मृत्यू झाला.
नातेवाईक बाथरुमला आले अन्...
लग्नासाठी आलेले नातेवाईक रविंद्र पाटील बाथरुमला जाण्यासाठी निघाले असतांना त्यांना हा प्रकार लक्षात आला. तातडीने त्यांनी कुटूंबीयांना आरडाओरड करुन बोलावले. बाथरुममध्येच मुलगा प्रणवचा मृतदेह पाहताच आई रुपाली वडील रविंद्र यांनी हंबरडा फोडतच आक्रोश केला. त्यांना सावरत ग्रामस्थ नातेवाईकांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लग्नघरावर दुःखाचा डोंगर
मयत प्रणवच्या पश्चात आई दिपाली, बहिण वैष्णवी, लहान भाऊ सोमेश असा परिवार आहे. लग्नामुळे कुटूंब, नातेवाईक आणि गाव-गल्लीत आनंदाचे वातावरण असतांना अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे क्षणार्धात चित्र पालटून शोककळा पसरली होती. बहिणीच्या लग्नापूर्वीच तिच्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.