Seized building of Mahavir Society in Navi Peth. Along with Collector Office and District Bank Officers. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा बँकेतर्फे महावीर सोसायटीची इमारत जप्त

कर्जाची परतफेड न केल्याने जिल्हा बँकेने महावीर सोसायटीची नवी पेठेतील इमारत तसेच एका संचालकाचा प्लॉट जप्त करून ताबा घेण्याची कारवाई मंगळवारी (ता.२३) केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कर्जाची परतफेड न केल्याने जिल्हा बँकेने महावीर सोसायटीची नवी पेठेतील इमारत तसेच एका संचालकाचा प्लॉट जप्त करून ताबा घेण्याची कारवाई मंगळवारी (ता.२३) केली आहे. इतर संचालकांवरही बुधवारी (ता.२४) जप्तीची कारवाई करून ताबा घेण्यात येणार आहे.

ताबा घेतलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करणार असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे. (Building of Mahaveer Society seized by District Bank jalgaon news)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २००२ मध्ये महावीर अर्बन सहकारी पतपेढीला आठ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने दीड वर्षाची एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुविधा दिली होती.

मात्र ही सुविधा दिल्यानंतरही सोसायटीने कर्जफेड केलेली नाही, त्यामुळे जिल्हा बँकेने महाराष्ट्र सरकार अधिनियम १९६०चे कलम ९८-ब अंतर्गत सहकार न्यायालय यांच्याकडून वसुली प्रमाणपत्र मिळविले होते.

सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. तालुका उपनिबंधक चैतन्यकुमार नासरे यांच्या समक्ष महावीर पतपेढीची नवी पेठेतील गोलाणी संकुलाजवळील इमारत जप्त केली. त्यानंतर संचालक तुळशीराम खंडू बारी यांचा ज्ञानदेव नगरातील प्लॉट जप्त केला.

तसेच या मालमत्तेचा ताबाही जिल्हा बँकेने घेतला आहे. जिल्हा बँकेचे जप्ती अधिकारी मयूर पाटील यांनी हा ताबा घेतला. यावेळी महावीर अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक नंदराम पाटील उपस्थित होते.

तर जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे, कर्ज वसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे, बँकीग व स्टॅटीटीक विभागाचे व्यवस्थापक सुनील पवार, बिगर शेती कर्ज व देखरेख विभागाचे व्यवस्थापक अतुल तोंडापूरकर.

ऑडिट व इन्स्पेक्शन व्यवस्थापक आर. आर. पाटील, शेती कर्ज व देखरेख विभाग व्यवस्थापक सुनील पाटील तसेच बँकेचे पथक उपस्थित होते.

खंडपीठात याचिका फेटाळली

कर्ज वसुली विभागाचे व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे यांनी सांगितले की, जप्तीच्या कारवाई स्थगितीसाठी संचालक मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठात गेले होते.

मात्र खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जप्ती व ताब्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT