Sand tractors seized from the Tehsil office since last year. esakal
जळगाव

Jalgaon News : वाळूमाफियांच्या मालमत्तांवर बसविणार बोझे; गौण खनिज चोरीप्रकरणी सक्त कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गौण खनिज चोरीप्रकरणी दंड न भरलेल्या वाळूमाफियांच्या मालमत्तांवर बोझे बसविण्यात येणार आहे. तसेच लवकरच मालमत्ता लिलावाची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार बी. ए. कापसे यांनी दिली.

तालुक्यात तब्बल चौसष्ट वाळू चोरीची विविध वाहने पकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे आणि वाळूच्या चोरीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. कायदेशीर कार्यवाही करून वाहन मालकांना वारंवार नोटीसा देऊन देखील वाहनमालक आपला दंड भरून वाहन सोडवत नाही. (Burden will be placed on properties of sand mafia jalgaon crime news)

महसूल प्रशासनाने वाळू चोरीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करून सक्त कारवाईचे पाऊल उचलत वाळूमाफियांना दणका दिला आहे. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. दहा वाहनमालकांच्या मालमत्तेवर बोझा बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तालुक्यातील गणेश सावकारे (अटवाडे), राकेश चव्हाण, नंदू चव्हाण (ऐनपूर), रामू सवर्णे (निंभोरासिम), सुनील सावळे (नेहते), रमेश तायडे (बलवाडी), संजय महाजन (विवरे खुर्द), इमाम उस्मान तडवी (चिनावल), अब्दुल रफिक मुतल्लीक, सुधीर घेटे (रावेर) अशा दहा वाळू वाहनमालकांच्या शेती, प्लॉट, अशा मालमत्तेवर बोझे बसवून मालमत्तांचे  लिलावाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी दिली.

तसेच तहसील कार्यालयाकडे पडून असलेल्या उर्वरित ५४ वाहनांच्या मालकांच्या मालमत्तेवर बोझे बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच बोझे बसवून त्यांची सुद्धा लिलावाची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळूमाफियांवर जरब बसविण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकावर पाळत ठेवणाऱ्यांचा शोध घेतला जाणार असून, तसेच पुढील काळात अशा पाळत ठेवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला होता. जळगाव जिल्ह्यात वाळू ठेक्यांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित आहे. अशात जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे. यावलसह विविध भागात पथकावर हल्ल्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT