A citizen straightening an overturned car.  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : टायर फुटल्याने सुसाट कार उलटली... दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : नशिराबादवळील उड्डाणपुलावर भुसावळकडून जळगावकडे सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले. यामुळे कार उलटली. या अपघातात जिल्‍हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासह इतर बालंबाल बचावले. (car overturned due to burst tyre jalgaon accident news)

माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू तथा जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे शनिवारी (ता. २२) दुपारी भुसावळकडून जळगावकडे येत असताना, नशिराबादजवळील उड्डाणपुलावर कार (एमएच १९, सीओ ८२४०)चे टायर अचानक फुटल्याने चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व कार उलटली.

इतर वाहनधारकांनी कारमधून एका मागून एकाला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रवाना केले. अपघातग्रस्त कारमध्ये जिल्‍हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासोबत सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघातात किरकोळ दुखापत वगळता कोणासही मोठी इजा झालेली नाही. अपघातग्रस्त कार अनिल झंवर यांची असल्याची माहिती समोर आली आहे.

रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसांत या प्रकरणी कुठलीही नोंद झाली नव्हती. मात्र, कार ताब्यात घेतल्याची माहिती नशिराबाद पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT