Jalgaon Crime News : खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. (Caretaker Ganesh Pandit also harassed minor boy in Jalgaon Crime News )
काळजीवाहक गणेश पंडित याच्या चिथावणीमुळे अनाथ मुलांच्या बालगृहातील काही अल्पवयीन मुलांनी अत्याचार पीडित मुलास मारहाण केल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष, त्यांची दोन्ही मुले, काळजीवाहक व मारहाण करणारी आठ अल्पवयीन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडके बुद्रुक येथे तळई येथील (कै.) यशवंतराव बळिराम पाटील शिक्षणप्रसारक मंडळ संचालित अनाथ मुलांचे व मुलींचे बालगृह आहे. या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली असून, संशयित गणेश पंडित यास अटक केली आहे.
दरम्यान, शनिवारी (ता. २९) बालगृहातील अल्पवयीन मुलानेही, गणेश पंडित याने अत्याचार केल्याची तक्रार केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. अकरावर्षीय अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की होळीच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलाने पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचा काळजीवाहक पंडित याच्या सांगण्यावरून अनाथ अल्पवयीन मुलांनी पीडितास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच, काळजीवाहक पंडित याने एका रविवारी दुपारी दीडच्या सुमारास वसतिगृहात कोणीही नसल्याचा फायदा घेत पीडित मुलगा स्वच्छतागृहात गेला असता त्याच्यावर शारीरिक अत्याचार केला. जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
याबाबत पीडित मुलाच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह वसतिगृहातील आठ अल्पवयीन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक गोराडे तपास करीत आहेत.
संस्थाध्यक्षासह दोघे फरारी
संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन पाटील व भूषण पाटील फरारी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन मुलांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले.
अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुली आणि मुले यांच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, दोषींना कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.