crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जातीवाचक शिवीगाळप्रकरणी पतीच्या वकिलाविरुद्ध गुन्हा; 5 संशयितांविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : खेडी येथील विवाहितेच्या कौटुंबिक वादासंबंधी प्रकरणात न्यायालयात दावा सुरु आहे. याप्रकरणी महिलेने पतीला फारकत द्यावी यासाठी पतीचे वकील ॲड. वैभव जोशी (रा. खेडी ता. जळगाव) यांनी पीडितेस उद्देशून पतीला फारकत दे अन्यथा खोट्या केस करून तुला बरबाद करेल, अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार विवाहितेने दिल्यावरुन एमआयडीसी पोलिसांत वैभव जोशी यांच्याविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Case against husband lawyer in case of caste abuse jalgaon crime news)

औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात पीडित विवाहिता मिना गणेश वाघमारे (वय-२२ रा.खेडी ता.जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेडी बुद्रुक येथील पती-पत्नी यांच्यातील वादा प्रकरणी कौटुंबिक न्यायालयात दावा सुरु आहे. यात वैभव जोशी हे महिलेच्या पतीकडून वकील आहेत.

महिला या वकील जोशी यांच्याकडे गेल्या असता त्यांच्याशी जोशी यांनी अश्लील भाषेत बोलून जातीवाचक शिवीचा उच्चार केला. तरी, तक्रारदार विवाहिता जुमानत नाही म्हणून खोट्या केसमध्ये अडकून बरबाद करण्याची धमकी दिली.

अशी धमकी देत ते महिलेसह यांच्यासह त्यांच्या आईच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार (ता.२७ सप्टेंबर) घडला होता. जोशी यांच्यासह इतर चार जणांनीदेखील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पीडित महिला मीना वाघमारे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून वैभव जोशी, वैशाली वैभव जोशी, विश्वनाथ दीक्षित, उषाबाई विश्वनाथ दीक्षित, हर्षद विश्वनाथ दीक्षित (तिघे रा. खेडी) अशा एकूण पाच संशयितांविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती कायदा कलम-३(१)(आर) ॲट्रासिटीअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT