Railway Security Force personnel handing over a child to his family  esakal
जळगाव

RPF Children Rescue : हरवलेल्या 408 मुलांची सुटका; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’तून आरपीएफची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

RPF Children Rescue : आपल्या आई -वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेली, अशा आपल्या घराची वाट चुकलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा आपले आई-वडील, घर मिळावे यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी गेल्या ३ महिन्यात ४०८ बालकांची घरवापसी केली आहे. (Central Railway Security Force jawans have rescue 408 children in last 3 months jalgaon news)

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल ते जून या गेल्या ३ महिन्यांत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ४०८ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे.

एकट्या भुसावळ विभागातून ११९ मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात ९४ मुले व २५ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक बलाच्या जवानांना आढळतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

गेल्या तीन महिन्यातील मोहिमेची फलश्रुती

- भुसावळ विभागात ११९ मुलांची सुटका. यात ९४ मुले व २५ मुलींचा समावेश.

- पुणे विभागात सर्वाधिक १३८ मुलांची सुटका. यात १३८ मुलांचा समावेश.

- मुंबई विभागात ९२ मुलांची सुटका.यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश.

- नागपूर विभागात ४० मुलांची सुटका. यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश.

- सोलापूर विभागात १९ मुलांची सुटका.यात ७ मुले व १२ मुलींचा समावेश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT