MP Unmesh Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad etc. while inspecting the bus depot of the e-bus service to be started by the Municipal Corporation on Thursday. esakal
जळगाव

Jalgaon E Bus : जळगावच्या इ बससेवेला केंद्रांची मंजुरी; आमदारांकडून बस डेपो जागेचे पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon E Bus : जळगाव शहरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या इ- बससेवेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.

बसडेपो करण्यात येणाऱ्या जागेची गुरुवारी (ता.१६) खासदार व आमदारांतर्फे पाहणी करण्यात आली.(Centre approval for Jalgaon electric bus service jalgaon news )

जळगाव शहरात आता मुंबई, पुणे नाशिकप्रमाणे महापालिकेची इ- बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मार्गही निश्‍चीत करण्यात आला आहे. तसेच बसडेपो व बसथांबेही निश्‍चित करण्यात आले आहेत.

महापालिकेने पाठविलेला अहवाल केंद्र शासनाने मंजूर केला आहे. लवकरच शहरात पन्नास बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या बसेससाठी मेहरुण तलावाजवळील टी. बी. रूग्णालयाची जागा बसडेपो म्हणून मंजूर करण्यात आली आहे.

या ठिकाणाहून सर्व बसेस सुटणार आहेत. आज या बसडेपोच्या जागेची खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी पाहणी केली. तसेच लवकरात लवकर सदर जागेसंदर्भात अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याचा सूचना केल्या.

या प्रसंगी भरत अमळकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, महावितरणचे अभियंता चोपडे, मनपाचे विद्युत अभियंता एस. एस. पाटील, प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते. सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर शहरवासीयांना बससेवा उपलब्ध करून देण्याची मनपा ने तयारी केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT