Jalgaon GMC News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धुळे येथील एका ४५ वर्षीय महिलेच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या टीमने ही जोखमीची शस्त्रक्रिया करून संबंधीत महिलेला जीवदान दिले आहे.
धुळे येथील एक महिला गर्भाशय मुखाच्या आजाराने त्रस्त होती. तपासणीअंती तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. (Cervical cancer surgery of 45 year old woman in was successful at gmc jalgaon news)
धुळे येथील विविध रुग्णालयांत तपासणी करूनही कोणत्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपचार करता येत नव्हते.
अखेर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होऊ शकते, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी येथील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागांमध्ये तपासणी केली. तेथे डॉ. मिताली गोलेच्छा यांनी ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेसाठी अडीच तासांचा कालावधी लागला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांना सहयोगी प्रा. संजय बनसोडे, डॉ. राहुल कातखडे, डॉ. प्रतीक्षा देशमुख, डॉ. विनेश पावरा, डॉ. पूजा वाघमारे, डॉ. अमृता दुधेकर आदींनी सहकार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या महिलेवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी संपूर्ण टिमचे अभिनंदन केले आहे.
"गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच झाली. गरजू रुग्णांनी कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला कक्ष क्रमांक २१५ येथे सकाळी संपर्क साधावा." -डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.