Deputy Superintendent of Police Abhay Singh Deshmukh with cyclists.  esakal
जळगाव

Cyclist Pandharpur Wari : चाळीसगावातील सायकलपटूंची 19 तासांत पंढरीची वारी

सकाळ वृत्तसेवा

Cyclist Pandharpur Wari : पर्यावरण संतुलन, इंधन बचत आणि शरीर स्वास्थ, असा तिहेरी फायदा देणारी सायकल प्रत्येकाने दरदिवशी चालवली पाहिजे. पंढरपूरची पायी वारीची एक वेगळी परंपरा आहे. पर्यावरणपूरक सायकलवारीने त्याला कळसाचे स्वरुप आले आहे.

चाळीसगावचे हौशी सायकलपटू नाशिक ते पंढरपूर सायकलवारीत सहभागी झाले, ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोदगार चाळीसगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी येथे काढले. (Chalisgaon cyclists ride to Pandhari in 19 hours jalgaon news)

चाळीसगावातील १० हौशी सायकलपटूंचा नुकताच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गौरव झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपण पंढरपूरचे आहोत आणि पंढरपूरवारी सायकलवरून करणाऱ्यांचा गौरव माझ्या हातून होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे, असेही ते म्हणाले.

येथील सायकलपटू रवींद्र पाटील, टोनी पंजाबी, जिजाबराव वाघ, दीपक देशमुख, योगेश पवार, हर्षल पाटील, भूषण कायस्थ, किशोर महाजन, हेमंत कुलकर्णी, राजेंद्र वाणी यांनी नुकतीच नाशिक ते पंढरपूर वारी सायकलवरून पूर्ण केली. त्यांचा नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व गौरवपत्र देऊन अभयसिंह देशमुख यांच्या हस्ते गौरव झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साडेचारशे किमी अंतर पार

हौशी सायकलपटूंनी नाशिक ते पंढरपूर हे ४५० किलोमीटर अंतर अवघ्या १९ तासांत पूर्ण केले. यंदा उन्हाची तीव्रता वाढली असतानाही सायकलपटूंनी ही सायकलवारी ठरलेल्या वेळेत पूर्ण केली.

पंढरपुरात पोहचल्यांतर नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण आदी सोहळ्यात सहभागी झाले होते. रवींद्र पाटील, टोनी पंजाबी, जिजाबराव वाघ यांनी या आधी कोरोना काळात चाळीसगाव ते पंढरपूर सायकलवारी परतीच्या प्रवासासह अवघ्या ६ दिवसांत पूर्ण केली होती. त्यांनी ६ दिवसांत ११०० किमी अंतर पार केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT