Jalgaon Crime News : एक वर्षापासून विविध गुन्ह्यात सहभागी असलेला येथील गुंड तथा टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली याला शहर पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेऊन जेरबंद केले.
त्याच्यावर महिला अत्याचारासह हाणामारी तसेच इतर १३ गुन्हे दाखल आहेत. (Chalisgaon gangster Haider Ali arrest by police jalgaon crime news)
त्याला दोन वेळा हद्दपार करून त्याच्या विरोधात एक वेळा महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी सांगितले, की १८ नोव्हेंबर २०२२ ला रात्री नऊच्या सुमारास अण्णा कोळी यांच्या घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबीर खान ऊर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबीर खान, शेख नवाज शेख सलीम व इतर दोघा अनोळखींनी एकत्रित येऊन फिर्यादी वैभव रोकडे व साक्षीदार पृथ्वी कुमावत याला मारहाण का केली, याबाबत विचारणा केली.
फिर्यादी व साक्षीदारांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व चॉपरने फिर्यादीच्या डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी या सर्व संशयितांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तेव्हापासून या गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा फरार होता. त्याचा पोलिस कसून शोध घेत असतानाही तो मिळून आला नव्हता.
पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील यांना आज हैदर अली हा त्याच्या घरी आल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथक तयार केले.
ज्यात उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांच्यासह महेंद्र पाटील, भूषण पाटील, विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, महिला पोलिस कर्मचारी विमल सानप यांचा समावेश होता. पथकाने अचानक हैदर अलीच्या घरी धडक देऊन त्याला अटक केली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी, हेड कॉन्स्टेबल विनोद भोई, प्रकाश पाटील हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.