Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Chalisgaon Market Committee Election : दिग्गजांनी दंड थोपटल्याने चुरस; आरोपांच्या फैरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांनी दंड थोपटल्याने चुरस निर्माण झाली आहे. (Chalisgaon Market Committee Election 42 candidates have entered election for 18 seats jalgaon news)

बाजार समितीची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपल्यानंतर निवडणुका लागल्या नाहीत. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ पासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ कार्यान्वित झाले होते. गेल्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता निवडणुका तब्बल दोन वर्षांनी जाहीर झाल्या.

सप्टेंबर २०१५ मध्ये बाजार समितीच्या सभापतिपदावरून भाजपमध्येच रस्सीखेच होती. त्या वेळी खासदार उन्मेष पाटील आमदार होते. त्यांनी मच्छिंद्र राठोड यांचे नाव सभापती पदासाठी सुचविले होते. मात्र रवींद्र पाटील (उंबरखेड) यांनी सुद्धा सभापतिपदासाठी अर्ज भरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी पाटील यांना पाठिंबा दिला आणि ते सभापती झाले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र पाटील हे उपसभापती झाले होते.

विद्यमान संचालकांमध्ये सरदारसिंग पाटील (जामदा), बळवंतराव पाटील (मुदखेडे), बारीकराव वाघ (दहिवद), शोभाबाई पाटील (कळमडू), कल्याणराव पाटील (चिंचखेड), प्रकाश पाटील (आडगाव), शिरीषकुमार जगताप (पिंपळवाड निकुंभ), धर्मा काळे (सायगाव), जितेंद्र वाणी (चाळीसगाव), रावसाहेब चव्हाण आदी नवीन उमेदवारांनी या वेळी संधी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या समविचारी महाआघाडीच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांमध्ये विद्यमान माजी संचालकांमध्ये प्रदीप देशमुख (चाळीसगाव), दिनेश पाटील (बोरखेडा), महेंद्र पाटील (काकडणे), रोहिदास पाटील (बहाळ) यांचा समावेश आहे. तर १४ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

त्यामध्ये संजय पाटील (तलोंदे), राजेंद्र पाटील (माळशेवगे), अशोक पाटील (जामदा), सागर साळुंके(खेडगाव), राजेंद्र माळी (मांदुरणे), रत्नाबाई पाटील (वाकडी), चंद्रकला पाटील(देवळी), शेषराव अहिरराव(खेडी), संजीव राठोड (वलठाण), अनिल पाटील (बहाळ), अनिल चौधरी, अतुल चव्हाण, श्यामलाल तथा नाना कुमावत व रोशन जाधव (चाळीसगाव) आदींचा समावेश आहे.

दरम्यान, भाजप, शिवसेना (शिंदे गट), रिपाइं व समविचारी पक्षाच्या महायुतीच्या स्व. रामराव जिभाऊ शेतकरी सहकारी पॅनलच्या उमेदवारांमध्ये ९० टक्के उमेदवार भाजपच्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

त्यामध्ये कपिल पाटील (बहाळ), नवल पवार (दहिवद), प्रदीप पाटील (डोण), दगडू माळी (पोहरे), शैलेंद्रसिंग पाटील (शिदवाडी), रवींद्र पाटील (नांद्रे), वनिताबाई पाटील (कळमडू), हेमराज पाटील (ब्राह्मणशेवगे), राहुल पाटील (वाघडू ), प्रभाकर जाधव (चाळीसगाव), साहेबराव राठोड (तळोदे प्र.चा.), नीलेश वाणी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रभाकर घुमरे (चाळीसगाव) यांचा समावेश आहे. विद्यमान माजी संचालक किशोर पाटील (करजगाव), अलकनंदा भवर (रहिपुरी), रवींद्र पाटील (उंबरखेड), मच्छिंद्र राठोड (वलठाण) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT