State President Chandrasekhar Bawankule while interacting with the public in BJP's 'Sampark Te Samtar' campaign. esakal
जळगाव

Chandrashekhar Bawankule: देशात 2 कायदे आणण्याचे ‘पाप’ काँग्रेसचे : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule : एका देशात दोन कायदे आणण्याचे ‘पाप’ काँग्रेसचे आहे. पण, भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता येताच, काश्‍मीरचे ३७० कलम रद्द करण्याचा कायदा केला.

त्यामुळे देशातील मोठ्या प्रमाणात जनता काश्‍मिरात जाऊन श्रीनगरच्या चौकात भारताचा झेंडा फडकवत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. २९) येथे सांगितले.

घाणेकर चौक ते सुभाष चौकापर्यंत ‘संपर्क ते समर्थन’ अभियान राबविण्यात आले. सुभाष चौकातील समारोप सभेत बावनकुळे बोलत होते. बावनकुळे यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. (Chandrashekhar Bawankule Congress sin of bringing 2 laws in country jalgaon news)

विजय चौधरी, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्‍याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता ३७० कलम रद्द केले. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना युरियासाठी दहा लाख कोटींची सबसिडी दिल्याने युरिया स्वस्त मिळतो. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे काम पंतप्रधानांनी केले. आता २८ पक्षांनी एकत्र येऊन श्री. मोदी यांना हरवण्याची शपथ घेतली. मात्र, श्री. मोदी हेच २०२९ पर्यंत पंतप्रधान असतील.

‘खडसेंनी सुभाष चौकात जाहीर सांगावे’

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन हिंदू धर्म संपविण्याच्या केलेल्या उल्लेखावर टीका करून बावनकुळे यांनी सनातन हिंदू धर्म संपविण्याचे भाष्य करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत जनता मतदानातून संपविणार आहे, असा दावा केला. इंडिया आघाडीतील नेत्यांचा त्यांनी स्टॅलीन यांनी केलेल्या विधानावरून समाचार घेतला.

या वेळी त्यांनी एकनाथ खडसे यांचा उल्लेख केला. बावनकुळे म्हणाले, की सनातन हिंदू धर्म संपविण्याचे स्टॅलीन यांचे वक्तव्य एकनाथ खडसे यांना मान्य आहे का? हे त्यांनी सुभाष चौकात जाहीरपणे सांगावे. अन्यथा, त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनीही याबाबत भूमिका जाहीर करावी.

पृथ्वीराज चव्हाणांनी केला नाही मराठा आरक्षणाचा विचार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर मराठा आरक्षणाबाबत केलेल्या टीकेवर बावनकुळे म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीही मराठा आरक्षणाचा विचारच केला नाही.

त्याबाबत सर्वप्रथम विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्या वेळी त्यांनी आरक्षण दिले; परंतु चव्हाण यांच्या महाविकास आघाडी सरकारला ते न्यायालयात टिकविता आले नाही. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण देतील, तेही कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT