Chandrashekhar Bawankule : हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. (Chandrashekhar Bawankule statement about Sharad Pawar Hindenburg report stance nashik news)
ते म्हणाले, की शरद पवार खरे बोलले असून, त्यांची भूमिका प्रगल्भ आहे. आदानींबाबत काँग्रेसने फक्त आरोप करण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट फक्त किंचित सेनेपुरता मर्यादित राहिला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना असल्याचे ते म्हणाले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकांशी संवाद साधला. ते म्हणाले, की भारताची प्रगती अनेकांना खुपायला लागली आहे. हिंडेनबर्ग अहवाल हा त्याचाच भाग आहे. हिंडेनबर्ग सारख्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवणार का, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. ती भूमिका योग्य व प्रगल्भ आहे.
त्यामुळे देशाच्या विकासासाठी उद्योग वाढले पाहिजेत, सध्या भारत आत्मनिर्भर होत आहे. भारताची प्रगती जगाला खुपत आहे. त्यामुळे हिंडेनबर्गसारख्या विदेशी संस्था आरोप करून देशाच्या प्रगतीला खीळ घालत आहेत. शरद पवार यांनी ‘अदानी’बाबत जे वक्तव्य केले आहे, ते खरेच आहे. महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत युती करण्यासंदर्भात चर्चा आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
मात्र परिस्थिती बघून स्थानिक नेते यावर निर्णय घेतील. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघात केला आहे. मनभेद-मतभेद राजकारणात होऊ शकतात ते दूरदेखील होऊ शकतात. परंतु विश्वासघातासारखे राजकारण करणाऱ्यांना भाजपमध्ये कुठलेही स्थान नाही. भाजपत मोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असून, ठाकरे गट म्हणजे किंचित सेना राहिली आहे. किंचित सेनेने शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे कारण नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे, हे पाचशे वर्षांपूर्वीचे भारतीयांचे स्वप्न होते, ते आता पूर्ण होत असून, त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादीचेही भाजपला मतदान
भाजपच्या बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी बावनकुळे म्हणाले, की प्रत्येक बूथवर भाजपला ५१ टक्के मिळाली पाहिजेत. अभियान यशस्वी राबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताही भाजपला मतदान करेल. ३० एप्रिलपर्यंत तीन लाख नागरिकांची नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाफील राहू नये.
सध्याचा संक्रमण अवस्थेचा काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील विचार रोखण्यासाठी विजय आवश्यक आहे. लाभार्थ्यांपर्यंत विकास पोचविणे गरजेचे आहे, यासाठीच बूथ सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे. सरल ॲप भाजप व केंद्र सरकारमधील दुवा आहे. या माध्यमातून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवा.
आपल्या भागातील ३० लोकांची सरल ॲपमध्ये नोंदणी करावी. या अभियानातून ९७ लाख लोकांची माहिती आपण नोंदविण्याचे उद्दिष्ट नाशिकला देण्यात आले. बूथ शक्ती केंद्रप्रमुखांनी सरल ॲप डाउनलोड न केल्याने त्यावर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.