'HD Varsha' nozzles used for launch pad at Chandrayaan-3's launch site (indicated by red arrow) and nozzles used for 'Chandrayaan-3' esakal
जळगाव

Chandrayaan 3 : खानदेशसाठी गौरवास्पद! ‘चांद्रयान-३’च्या लाँचिंगमध्ये जळगावचा ‘खारीचा वाटा’

सचिन जोशी

Chandrayaan 3 : विज्ञान-तंत्रज्ञानात स्वयंपूर्णच नव्हे, तर विश्‍वविख्यात झालेल्या भारताने ‘चांद्रयान-३’चे शुक्रवारी (ता. १४) यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेच्या प्रक्रियेत आपल्या जळगाव जिल्ह्यानेही ‘खारीचा वाटा’ उचलला आहे.

चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे निर्मित ‘लाँच पॅड’मध्ये जळगावातील एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीत उत्पादित ‘एचडी वर्षा’ नोझल्स वापरण्यात आले आहेत. (chandrayaan 3 HD Varsha nozzles manufactured at HD Fire Protect in Jalgaon were used in launch pad jalgaon news)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) शुक्रवारी तिसरी चांद्रमोहीम सुरू केली. त्यानुसार दुपारी अडीचला ‘चांद्रयान-३’ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘इस्त्रो’चे नामवंत शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या मोहिमेत आपापल्या परीने समर्पित भावनेने योगदान देत आहेत. या मोहिमेच्या एकूणच प्रक्रियेत जळगावचेही योगदान समोर आले असून, ती आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.

‘एचडी फायर’ उत्पादित नोझल्सचा उपयोग

चांद्रयान-३’च्या प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे जे लाँच पॅड तयार करण्यात आले आहे, त्याच्या निर्मितीत जळगावातील एचडी फायर प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत डिझाइन आणि उत्पादित नोझल्स वापण्यात आले आहेत. ते प्रामुख्याने ॲल्युमिनियमपासून बनविण्यात आले असून, लाँच पॅड निर्मितीत या नोझल्सने महत्त्वाचे कार्य साध्य केले आहे.

आवाज नियंत्रण उपकरणात ‘एचडी वर्षा’

सॅटेलाइट प्रक्षेपणाच्या वेळी ‘लाँच पॅड’ परिसरात प्रचंड मोठा आवाज होतो. या महाप्रचंड आवाजाची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी ‘हाय व्हीलॉसीटी वॉटर जेट नोझल स्प्रे’ प्रणाली वापरली जाते. या नोझल स्प्रे प्रणालीत प्रतिमिनिट अडीच लाख लिटर या वेगाने पाण्याचे फवारे बाहेर पडतात. त्यामुळे हा आवाज विशिष्ट डेसिबलपेक्षा कमी होत नियंत्रित राहतो. या प्रणालीत ‘एचडी वर्षा’ या ब्रॅन्डचे ८८ नोझल्स वापरण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तपासणीनंतर ‘ओके टेस्टेड’

‘एचडी फायर’ ही मूळत: आगरोधक (फायर फायटिंग) उपकरणं बनवते. त्याचा प्रामुख्याने मोठ्या कंपन्यांमध्ये उपयोग होत असतो. अशा प्रकारचे नोझल्स बनविण्याचा कंपनीला अनुभव असल्यामुळे ‘इस्त्रो’साठी उपकरणं, साहित्य बनविणाऱ्या एजन्सीचे वेंडर म्हणून ‘एचडी फायर’शी संपर्क करण्यात आला.

संबंधित एजन्सीच्या तज्ज्ञानी कंपनीला भेट देऊन नोझल्स उत्पादनाची माहिती घेतली तसेच दर्जा व गुणवत्ताही तपासली. त्यानंतर हे नोझल्स बनविण्याची ‘ऑर्डर’ देण्यात आली. कंपनीनेही वेळेत ही मागणी पूर्ण केली. या उत्पादन प्रक्रियेत कंपनीचे मुख्य व्यवस्थापक सुधीर पाटील, उपमुख्य व्यवस्थापक प्रणव खुर्गे, अमर मेहता यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

"‘चांद्रयान-३’सारख्या आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी मोहिमेतील लाँच पॅड निर्मितीत जळगावच्या आपल्या कंपनीचे उत्पादन वापरण्यात आले, ही मोहीम यशस्वी ठरतेय, याचा आनंद व अभिमान वाटतो." - मिहीर घोटीकर संचालक, एचडी फायर प्रोटेक्ट प्रा. लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT