Jalgaon News : मौजे गोंभी (ता.भुसावळ) येथील फेरफार नोंद प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी तलाठी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.
याबाबत नायब तहसीलदार अंगद असटकर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली असता त्यांनी मौजे गोंभी येथील फेरफार नोंद क्रमांक १३५८ नामंजूर करण्यात आल्याचे आदेश दिले. (Change entry at Gombi is rejected by tehsildar jalgaon news)
बाळू दौलत पाटील, मुकुंदा दौलत पाटील, सुधाकर दौलत पाटील, संतोष दौलत पाटील यांच्याकडून डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे यांनी गोंभी शिवारातील गट नं. ७४/१ दस्त क्र. ३५३२/२०२३ नुसार खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले होते.
परंतु सदरची जागा ही वर्ग २ ची असल्यामुळे त्यामध्ये तहसीलदार यांची खरेदी विक्रीसाठी (३२ एम) पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदरचा व्यवहार हा बेकायदेशीर असल्याने सदरच्या खरेदीखत अन्वये नोंद घेवू नये अशी हरकत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते सानप यांनी घेतली.
त्याअनुषंगाने नायब तहसीलदार अंगद असटकर यांच्याकडे सुनावणी झाली असता आदेशामध्ये अर्जदार यांचा अर्ज ११ ऑगस्ट २०२३ रोजीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मौजे गोंभी येथील फेरफार नोंद क्रमांक १३५८ नामंजूर करण्यात आली असा आदेश ९ ऑक्टोबर २०२३ रोजी नायब तहसीलदार यांनी दिला.
या प्रकरणी बाळू पाटील, मुकूंदा पाटील, सुधाकर पाटील, संतोष पाटील यांच्यातर्फे अॅड. किशोर राजपूत व डॉ.कोळंबे यांच्यातर्फे अॅड. प्रकाश फेगडे यांनी कामकाज पाहिले तर केदार सानप यांनी स्वतः आपली बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.