Cyber Fraud Crime : शहरातील एका उच्च शिक्षित तरुणीला पोलिसाचा भाऊ असलेल्या एका भामट्याने सोशल मीडियावर डॉक्टर असल्याचे सांगत प्रेमाचे नाटक करून पैसे उकळले. त्याचे बिंग फुटल्यावर आता पीडित तरुणीला ‘ब्लॅकमेल' करून पोलीस भावाच्या नावे धमकावत असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विस्तारित शिवाजीनगर परिसरात साधारण पंचविशीतील तरुणी पतीच्या अकाली निधनानंतर माहेरी राहत आहे. या विधवेला एक मुलगी असून दोघी मायलेकी आपले आयुष्य जगत असून विधवा तरुणी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Cheating by befriending young widow cyber fraud crime jalgaon news)
जगासोबत चालता यावे म्हणून ही तरुणी सोशल मीडिया साईटवर वेळ मिळेल तसे ‘ॲक्टीव्ह' राहते. अशातच, एका भामट्याने या तरुणीला सोशल मीडियावर गाठले. ओळख झाल्यावर दोघांच्या संदेशासह फोटोंची देवाण-घेवाण होऊन मैत्री झाली.
अशी फसवणूक
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर डॉ. सैफ खान नावाने प्रोफाईल असलेला हा भामटा पीडिता राहत असलेल्या कॉलनीत राहतो. मात्र आपण नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये नोकरीला असल्याचे सांगून त्याने प्रेमाची कबुली करून घेतली.
सोबत या विधवेच्या मुलीलाही सांभाळून घेण्याची तयारी दर्शविल्याने पीडितेस विश्वास होऊन तिने आईला सांगितले. तिच्या आईलाही हायसे वाटले. मुलीचा परत संसार सुरु होणार म्हणून दोघी मायलेकी खूष होत्या. डॉ. सैफ नावाच्या या भामट्याच्या भेटीगाठी, वाढदिवस साजरा झाला अन् अचानक या पीडितेच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
माय-लेकीला धक्का
शिवाजीनगर परिसरात लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे काम सुरु आहे. कॉलनीच्या ग्रुपमध्ये डॉ. सैफ खान याचा फोटो पाहिल्यावर मुलीने त्याला फोन केला. मला इलेक्शनचे काम दिल्याचे सांगून त्याने वेळ मारुन नेली. मात्र त्याचा पत्ता व इतराकडून माहिती घेतल्यावर हा भामटा पूर्वीच तीन मुलांचा बाप आहे व डॉक्टर नसून बांधकाम साईटची कामे करतो, असे लक्षात आल्यावर माय-लेकीला धक्का बसला.
सोन्याची अंगठी घेतली काढून
पीडितेच्या वाढदिवसाला आला अन् तिच्या बोटातील सोन्याची अंगठी निशाणी म्हणून काढून घेतली. गरीब मावशीचे ‘ऑपरेशन' असल्याचे सांगत पीडितेकडून ६५ हजार रुपये ऑनलाईन मागवले. मात्र तो डॉक्टर नसल्याचे कळताच, मुलीने अंगठी व पैसे मागितल्यावर भामट्याने ‘तुझे फोटो व्हायरल करतो, माझे पुरे खानदान पोलिसांत आहे.. तू काहीच बिघडवू शकत नाही’ असे म्हणत धमकावत असल्याने पीडितेने शहर पोलीस ठाणे गाठून गाऱ्हाणे मांडले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.