जळगाव : दिलेला टास्क पूर्ण केल्यास त्या बदल्यात अधिक नफा देण्याचे अमिष दाखवत भुसावळ येथील तरुणाची सात लाखांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी सायबर शाखेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेत खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नी यांच्या खात्यावरूनही रक्कम काढली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संबंधित आयडी युजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cheating with Lure of Task Completion young man from Bhusawal cheated of 7 lakhs Jalgaon Crime News)
शोएब खान रऊफ खान (३७, रा. भुसावळ) हे व्यापारी असून त्यांच्याशी १७ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान एकाने संपर्क साधत सोशल मीडियावर लिंक पाठवून टास्क दिला. तो पूर्ण केल्यास त्या बदल्यात अधिक नफा देऊ, असे त्यांना सांगण्यात आले.
त्या दरम्यान खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नीच्या बँक खात्यातून संबंधिताने वेळोवेळी एकूण सहा लाख ९१ हजार ७८ रुपये काढले.
त्या बदल्यात नफा तर दूरच हातची रक्कम गेली व कोणताच मोबदला मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि खान यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.