While inspecting the well, Chief Executive Officer Shri Ankit, Deputy Deputy Executive Officer Aniket Patil, Group Development Officer Kishore Shinde, Dheeraj Patil, Sandeep Sonwane and villagers. esakal
जळगाव

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनच्या २८ योजना कार्यान्वित करा : मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित

Jalgaon News : तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या २८ योजना तत्काळ सुरू कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : तालुक्यात ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई समस्या निर्माण होत असल्यामुळे तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या २८ योजना तत्काळ सुरू कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी दिल्या. तसेच पाणीयोजनांच्या वीजपुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीकडे त्वरित मागणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Chief Executive Officer of Zilla Parishad Shri Ankit statement Implement 28 Schemes of Jal Jeevan Mission)

खेडी ढोक (ता.पारोळा) श्री अंकित यांनी भेट दिली. त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. सोबत उप- मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, अभियंता धीरज पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील, शाखा अभियंता संदीप सोनवणे, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.

आढावा घेत असताना तालुक्यात पाणीटंचाई सदृश्य गावांची पाहणी करून माहिती तयार करा आणि तसे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवा जेणेकरून त्यावर उपाययोजना त्वरित करता येईल त्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. (latest marathi news)

खेडीढोक गावात ६ मार्चपासून सुरवातीला दोन टँकर सुरू केले होते परंतु आज दररोज चार टँकर पाणीपुरवठा केला जात आहे ज्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो त्या विहिरीचेही परीक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT