Jalgaon Crime News esakal
जळगाव

Crime : बालपणाचे मित्र बनले पक्के वैरी; मित्रांकडूनच खुनाचा जळगाव पॅटर्न

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मध्यरात्रीच्या हत्या प्रकरणातील मृत भावेश उत्तम पाटील आणि भूषण रघुनाथ सपकाळे हे दोघेही पक्के मित्र. कोरोनापूर्वी दोघांचा सोबत व्यवसाय होता. मात्र, नंतर वाळूतील अर्थकारणावरून भावेश एका गटात आणि भूषण दुसऱ्या गटात गेला.

पैशांचा बाकी असलेला हिशेब आणि मृत भावेश आणि मारेकरी, असे एकाच महिलेच्या संपर्कात असल्याने त्यातूनही या वादाला खतपाणी मिळून त्याचा परिपाक खुनाच्या घटनेत झाला. (Childhood friends become staunch enemies Jalgaon pattern of murder by friends Crime latest marathi news)

वाळूने नदीकाठच्या गावांना पाण्यासारखा पैसा मिळवून दिला. कधी काळी झोपडीत राहणाऱ्यांना वाळूने बंगल्यात आणल्याने काही वर्षांत झालेली वाळूमाफियांची प्रगती डोळे दीपवणारी आहे.

वाळू व्यवसाय अधिकृत सुरू असताना, २४ तास व्यस्त असणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळ्या आता चक्क गुन्हेगारीत उतरल्या असून, व्याजाचे धंदे, पैसा वसुलीची कामे ही मंडळी करीत आहेत. त्यात वेगवेगळे गटही कार्यरत आहेत.

दोघा मित्रांची कहाणी

मृत भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे) व भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३०, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) असे दोघेही लहानपणाचे मित्र. वाळूच्या व्यवसायातही दोघे सोबतच सक्रिय झाले. अनेक वर्षे सोबत काम केल्यावर आव्हाणे गावात सक्रिय असलेल्या वाळूमाफियांच्या दोन वेगवळ्या टोळ्यांमध्ये भूषण व भावेशही सक्रिय झाले.

सोबत व्यवसाय असताना, हिशेबाची देणदारी भावेशकडे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यापेक्षाही भावेश व भूषण एकाच महिलेच्या संपर्कात आल्यावरून झालेल्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. मारेकरी ताब्यात आल्यावरच या सर्व बाबींवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दगडी (शंभूनारायण) चाळचा सपोर्ट

शहरातील आसोदा रोडवरील दाट लोकवस्तीत असलेल्या वाळू व्यावसायिकांच्या वस्तीला अरुण गवळीच्या दगडी चाळीप्रमाणे पूर्वी दगडी चाळ आणि आता ‘शंभूनारायण चाळ’ असे संबोधले जाते.

येथील मुन्नाभय्या (पहिलवान) गट आणि मोगली ग्रुप, अशा दोघांची बांभोरी, खेडी, आव्हाणे-आव्हाणी परिसरातील वाळू पानथ्यांवर चलती आहे. या गावांमध्ये कुठलीही घटना घडली, तर त्यात दोन्ही टोळ्याच त्याला हाताळण्याचे काम करतात. उचलून आणत मारहाण, वसुलीच्या कामांसाठी या टोळ्या सक्रिय आहेत.

भावेशवर संशय

भूषण व भावेशने बरीच वर्षे सोबत काम केल्यानंतर वाळू व्यवसायात वर्चस्व असलेल्या दोन वेगवेळ्या गटांत ते सक्रिय झाले होते.

भावेशची काही पोलिस, महसूल विभागाच्या लोकांमध्ये उठबस असल्याने आपल्या गटातील वाळू वाहनांवर झालेल्या कारवाया त्याने टीप दिल्याने झाल्याचा भावेशवर संशय होता. त्यासोबतच भूषणशी संबंधित असलेली महिला भावेशच्या मोबाईलवर फोन करीत असल्यानेही त्याचे पित्त खवळल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

गुन्हेगारी टोळ्या पोलिसमित्र

सरकारच्या पगारी पोलिस खात्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांनी पैशांच्या हव्यासापोटी खात्याची शिस्त केव्हाच दावणीला बांधली आहे. पूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्यात वाळूचे कलेक्शन करणारा पोलिस असायचा. आता मात्र ट्रॅक्टर-डंपर घेउन या पोलिसांनीच वाळूचे धंदे सुरू केले आहेत.

वाळूमाफिया टोळ्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधातून नव्या पद्धतीची पोलिस गुन्हेगारी जळगाव शहरात सुरू झाली आहे. अनेक वेळा गुन्हेगारांचे मित्र असणाऱ्या या पोलिसांवर कारवाईचे प्रसंग आले. मात्र, याच वाळूमाफियांनी स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर दबाव आणून कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यास भाग पाडले आहे. परिणामी, पोलिसांच्या साथीने संपूर्ण शहरच या माफियांनी विकत घेतल्याची परिस्थिती आहे.

शहरातील खुनांची मालिका अशी..

-१८ मार्च : सूरज विजय ओतारी (वय २२, रा. तुकारामवाडी)

-२६ मार्च : सागर नरेंद्र पवार (वय २८, समतानगर)

-२६ मार्च : नरेश आनंदा सोनवणे (वय २८, राजारामनगर)

-४ एप्रिल : मोहम्मद मुसेफ शेख इसाक (वय ४०, हुडको)

-९ एप्रिल : दिनेश भिकन पाटील (वय ४५)

-१६ मे : मुकेश रमेश राजपूत (वय ३२)

-२५ मे : अनिकेत गणेश गायकवाड (वय २९)

-३ जून : सागर वासुदेव पाटील (वय २७)

-२० जुलै : रहिम शहा ऊर्फ रमा (वय ३०)

-२३ जुलै : दिनेश काशीनाथ भोई (वय ३२)

-१० ऑगस्ट : संदेश लीलाधर आढाळे (वय २२, भादली)

-१४ ऑगस्ट : पूनमचंद गुलाबचंद वर्मा (वय ४२, पहूर)

-२१ ऑगस्ट : अक्षय अजय चव्हाण (वय २३, पिंप्राळा)

-२२ ऑगस्ट : मनोज संतोष भंगाळे (४०, चितोडा, यावल)

खुनाचा जळगाव पॅटर्न

जळगाव शहरात होणाऱ्या खुनाच्या घटनांमध्ये दारू आणि ओळखीच्या मित्राकडून खून झाल्याची बाब कॉमन आहे. दारू ढोसल्यानंतर मित्रानेच बोलावून नेत खून केल्याच्या पाच ते सहा घटना सहा महिन्यांत घडल्या आहेत. खुनानंतर मृतदेहावर दगड टाकून ओळख मिटविण्याचाही प्रयत्न काही घटनांमध्ये झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT