Jalgaon News : भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता बालकांचे लसीकरण ‘यु विन ॲप’वर नोंद करुनच होणार आहे. (Children vaccination record will now be done on u win app portal jalgaon news)
भारत सरकार आरोग्य मंत्रालयाने १ ऑगस्ट २०२३पासून बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण ‘यु विन ॲप’वर नोंद करुनच करण्याबाबत सूचना दिल्या असून त्यासंबंधी राज्य शासनाच्याही मार्गदर्शक सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झाल्या आहेत.
कोरोना लसीकरणाच्या धर्तीवर येणार संदेश
कोरोना काळात लसीकरणानंतर नोंद केलेल्या मोबाईलवर संदेश प्राप्त होत होता. त्याच धर्तीवर आता बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईलवर ‘यु विन पोर्टल’द्वारे संदेश येईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लसीकरणाशी संबंधित सर्व तपशीलाची या पोर्टलवर नोंद केली जाईल. यात लाभार्थ्यास कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. पोर्टलवर एका क्लिकवर लसीकरणाचा तपशील समजू शकणार आहे.
या बाबी आवश्यक
या प्रणालीसाी शहरातील लसीकरण केंद्रावर बालकांचे लसीकरण करण्यासाठी जाताना पालकांनी ‘यु विन ॲप’वर नोंदणीाठी आपले आधारकार्ड, मोबाईलसोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. या प्रणालीद्वारे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचीही गरज राहणार नाही. आपल्या मोबाईलवरील मेसेजद्वारे त्या समजू शकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.