Jalgaon News : तहसिल कार्यालयाने डिजिटल रेशनकार्ड’ (शिधापत्रिका) देणे सुरू केले आहे. आतापर्यंत ६० नवीन रेशनकार्ड धारकांना ऑनलाइन डिजिटल कार्ड देण्यात आले आहे. यापुढे आता नागरिक घरबसल्या रेशनकार्ड काढता येणार आहे.
यासह सेतू केंद्र, सीएससी केंद्रात जावून ऑनलाइन अर्ज केल्यावर रेशनकार्ड त्यांना मिळणार आहे. (Citizens will be able to get ration card at home jalgaon news)
यामुळे रेशनकार्डासाठी दलालांकडे जाण्याची किंवा तहसिल कार्यालयात येण्याची गरज नसेल. तसेच नियमित शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. यामुळे गोरगरिबांची दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.
ऑनलाइन डिजिटल कार्डाची प्रिंट काढून ते आधारकार्डासारखे वापरता येणार आहे. त्यावर संबंधित लाभार्थी कोणत्या प्रकारातील (बीपीएल, केशरी, पांढरे कार्ड) आहे. याची माहिती असेल. डिजिटल कार्डावरच त्या कुटुंबातील सदस्य संख्या, आधारकार्ड क्रमांक असेल. सध्या जळगाव शहरासह तालुक्यात रेशनकार्ड धारकांची संख्या १ लाख २२ हजार ८५५ आहे तर रेशन दुकाने २१४ आहे.
दलालांना चाप
तहसील कार्यालयात रेशनकार्ड काढून देण्यासाठी अनेक दलाल कार्यरत आहेत. ते लाभार्थ्यांकडून रेशनकार्ड काढून देण्यासाठी सुमारे पाचशे ते दोन हजार रुपये उकळतात. दलालांबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील यांनी पुढाकार घेत ऑनलाइन डिजिटल रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे दलालांना आता चाप बसणार असून शासकीय शुल्कातच सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळेल.
''जळगाव शहरासह तालुक्यात डिजिटल रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ६० लाभार्थ्यांना ऑनलाइन रेशनकार्ड देण्यात आले आहे. आता नागरिक स्वत: ऑनलाइन रेशनकार्ड काढू शकतात. त्यासाठी दलालांकडे जाण्याची गरज नाही. जिल्हाधिकारी आयूष प्रसाद, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल रेशनकार्ड देण्यात येत आहे.''- नामदेव पाटील, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.