Jalgaon News : शहरात गुरुवारी (ता. २०) सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात सोसाट्याच्या वाऱ्याच्या धूमशानमध्ये अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. (city was hit by sudden gale on 20 april jalgaon news)
त्यामुळे दुचाकीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविला होता. त्याची सुरवात सकाळीच साडेआठच्या सुमारास झाली. जळगाव शहरात सकाळी काही भागांत तुरळक पाऊस झाला.
सायंकाळी वादळी वारा
दुपारी साडेचारनंतर आकाशात ढगांनी प्रचंड गर्दी केली. ढगांचा गडगडाटही सुरू झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळ आले. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने तीन ते चार तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली होती.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
सायंकाळी अर्धा तासांच्या वादळी धूमशानमध्ये शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या. मात्र, शिवाजीनगर भागातील बदाम गल्लीत झाड पडून दुचाकीचे नुकसान झाले. थोडाफार पावसाचा शिडकावाही झाला.
वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्याने शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी वीजताराही तुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामात व्यत्यय आला. रात्री उशिरापर्यंत काही भागांत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.