Clash between Khadse Fadnavis over illegal business in Jalgaon news 
जळगाव

Khadse Vs Fadnavis : जळगावातील अवैध धंद्यावरून खडसे-फडणवीसांमध्ये खडाजंगी!

सकाळ वृत्तसेवा

Khadse Vs Fadnavis : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी (ता. ११) विधान परिषदेत केला. (Clash between Khadse Fadnavis over illegal business in Jalgaon news)

त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी कार्यक्षमता काय हे सर्वांना माहिती आहे, त्यांनी आपल्याला पुरावे द्यावेत, आपण कारवाई करण्यास तयार आहोत, असे सांगितले. दोन्ही नेत्यांची याप्रश्नावरून जोरदार खडाजंगी झाली.

महाराष्ट्र कॅसिनो निरसन कायदा विधेयक सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आले, त्यावर चर्चा सुरू असताना एकनाथ खडसे यांनी अवैध धंद्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला. ते म्हणाले, की राज्यात विशेषत: जळगाव जिल्हा व शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. या प्रकरणी आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल ५२ पत्रे नाव व पुराव्यासह दिले आहेत.

परंतु वर्षभरापासून त्याच्यावर कारवाईच झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपले प्रेम आहे, सभागृहात ते आपल्या मागे बसत होते. कधी ते आपल्या नेतृत्वाखाली काम करीत होते. आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत.

मात्र गृहमंत्री म्हणून ते अकार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. आपण जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत नाव, पत्त्यासह पुरावे दिले आहेत. त्यावर आपण कारवाई कधी करणार, याबाबत गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात माहिती द्यावी.

पुरावे द्या, कारवाई करतो ः फडणवीस

श्री. खडसे यांच्या प्रश्‍नाला उतर देताना उपमुख्यंमत्री फडणवीस म्हणाले, की आमची गृहमंत्री म्हणून कार्यक्षमता काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. नाथाभाऊ व माझे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. परंतु त्यांचे माझ्यावर वेगळ्या प्रकारचे प्रेम आहे. आपण अवैध धंद्यावर कारवाईबाबत पुरावे दिले आहेत, आपण दिलेल्या पत्रांबाबत आपले काही म्हणणे नाही.

परंतु पुरावे व्यवस्थित द्या, आपण जे पुरावे दिले आहेत, ते कारवाईसाठी खाली पाठविले आहेत. आपण जी यादी दिली आहे, त्यात आपल्या विरोधकांची नावे आहेत, असे चालत नाही. आपण सोबत काम केले आहे, आपण त्या वेळी पुराव्यासह आरोप केले आहेत. आपणही पुराव्यासह बोलत होता, त्या वेळचे नाथाभाऊ कुठे आहेत? असा प्रश्‍नही आपल्याला पडला आहे.

पोलिस एकतर्फी कारवाई कधीच करीत नाही, आपण पुराव्यासह यादी द्यावी, पोलिसांना खात्री झाल्यास निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवश्‍यक वाटले तर आपल्यासोबत आम्ही पोलिस देऊ, तुम्ही दाखवा ठिकाणे, पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT