जळगाव

NCP Vs Shivsena : चोपड्यात भुयारी गटारी कामांवरून ‘पोष्टर वॉर’; श्रेय लाटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

NCP Vs Shivsena : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिका हद्दीतील भुयारी गटर योजनेसाठी चोपडा नगरपालिकेला राज्य सरकारकडून ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

हा निधी मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात शहरात बॅनरबाजी करून पत्रकार परिषदा घेऊन दोन्ही पक्षांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे माजी गटनेते जीवन चौधरी आणि माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी पोष्टरवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा फोटो प्रकाशित करून शहरात आभार व्यक्त करणारे पोष्टर लावून पोष्टरबाजी केली आहे. (clash between ncp shiv sena on Underground sewerage works credit jalgaon news)

तर त्यास दुसऱ्या दिवशी शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे फोटो लावत आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचेही आभाराचे बॅनर झळकवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील व इतर पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिले आहे. पत्रकार परिषदेतून सदर बॅनरवर शासकीय आदेश प्रकाशित करून पोष्टर कोणत्या परवानगीनुसार लावण्यात आला आहे. हे पाहून आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा सज्जड इशाराही शिंदे शिवसेना गटाकडून देण्यात आला आहे.

सध्या राष्ट्रवादी व शिंदे सेना दोन्ही पक्ष एकमेकांवर बॅनरवॉर करीत असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करण्याच्या मागे लागलेले आहेत काय? अशी चर्चा होत आहे. तालुक्याच्या राजकारणाचे वाक्युद्ध व बॅनरबाजीचे दर्शन सोशल मीडियामार्फत लोकांना पाहायला मिळत आहे.

दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे

भूमिगत गटारीचा प्रस्ताव २५ ऑगस्टला शहराचा विकासासाठी माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी आणि जीवन चौधरी यांनी शहरातील भूमिगत गटारीसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याला प्रतिसाद देत निधी मिळाला असल्याचा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे.

तर चोपडा तालुक्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार लता सोनवणे यांनी मागील काही महिन्यांपासून भूमिगत गटारीसाठी केलेल्या पत्रव्यवहाराचे फोटो व्हायरल करत आमदारांनी केलेल्या प्रयत्नामुळे निधी मिळाला असल्याचा दावा केला जात आहे. यावरून दोन्ही पक्ष हे श्रेयवादापोटी तानातानी करण्यात मग्न आहेत.

भुयारी गटारीचा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वीच

हे दोन्ही पक्ष जरी श्रेय वादात गुंतले असले तरी भुयारी गटारीचा खरा प्रस्ताव हा दहा वर्षांपूर्वी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी ३ फेब्रुवारी २०१४ रोजी दिल्ली येथे मंत्रालयात तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्री (स्व.) माणिकराव गावित यांच्यामार्फत स्वतः रवाना केला होता आणि केंद्रीय मंत्री कमलनाथ यांची मंजुरी मिळवून थेट महाराष्ट्राच्या मंत्रालयात आणला होता. परंतु सध्या आगामी निवडणुका असल्याने हा श्रेय वाद सुरू झाला आहे. यावरून खरे श्रेय कुणाचे हे जाणकार जाणून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT