Plastic waste collected by the Municipal Corporation in various sections of the city. esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे प्लास्टिक हटाव मोहिमेत मोठ्या प्रमाणात स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे शहरातील प्लास्टिक कचरा हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.२४) शहरातील विविध भागातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

आता दर बुधवारी सफाई कर्मचाऱ्यांतर्फे शहरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.(Cleanliness on large scale in plastic removal campaign by Municipal Corporation in jalgaon news)

याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले कि, शहरात दैनंदिन साफसफाई होते, परंतु मुख्य रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक पिशव्या तसेच तत्सम कचरा पडलेला निदर्शनास येत असतो, त्याचा विपरीत परिणाम साफसफाईच्या कामकाजावर दिसून येत आहे. शहरात यापूर्वी आठवड्यातून एकदा प्लास्टिक साफसफाई मोहीम राबविण्यात येत होती.

सद्यपरिस्थितीत सणाचे दिवस असल्याने नागरिक व व्यावसायिक साफसफाई केल्यानंतर निघालेला कचरा इतरत्र रस्त्यावर फेकून देत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा संकलन मोहीम आजपासून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार आज शहरातील विविध भागात सफाई कर्मचाऱ्यांतर्फे साफसफाई मोहीम राबविण्यात आली. सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शहरातील प्लास्टिक कचरा साफसफाई करण्यासाठी दर बुधवारी सफाई कर्मचाऱ्यांतर्फे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.

''जळगाव शहरात प्लास्टिक कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे आता प्लास्टिक कचरा हटविण्यासाठी महापालिका मोहीम राबवीत आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे.''-उदय पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT