CM Eknath Shinde : ज्या ठिकाणी सायकलही पोचू शकत नाही. त्याठिकणी मध्यरात्री अडीचला मंत्री मदतीसाठी पोचून कार्य सुरू करतात, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत व्यक्त केले. (cm shinde praises girish mahajan on irsalwadi work jalgaon news)
यावरून युती सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन आता महायुती सरकारच्या जनतेचेही संकटमोचक असल्याचे दिसून आले. इर्शाळवाडी (ता. खालापूर) येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला ते मध्यरात्री अडीचला पोहोचले होते. त्यामुळे मदत कार्य वेगाने सुरू होऊन अनेकांचे प्राण वाचविता आले.
भाजप नेते गिरीश महाजन राज्यातील भाजप सरकारवर संकट आले. त्यावेळी ते धावून आले आहेत. जनतेच्या मदतीसाठी वेळोवेळी ते धावून येतात. अगदी रस्त्यावर अपघात झाल्यास लोकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:चे वाहन दिले.
त्यांनी स्वत: ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे, तर अगदी वस्तीत साप निघाला, तरी ते स्वत: त्याला पकडतात. असे धाडस ते ‘चमको’गिरीसाठी करतात, असे त्यांना विरोधकांनी टोपणेही मारले आहेत. मात्र, त्यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही.
.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भाजप आणि मित्र पक्ष युतीच्या सरकारच्या काळातही त्यांनी अनेक प्रसंगी मध्यस्थी केली आहे. नाशिकहून निघालेल्या शेतकरी मोर्चाला तेच सामोरे गेले होते. अगदी मोर्चेकरांसोबत ते चालले आणि नेत्यांशी चर्चा करून त्यांनी प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चेकरी व सरकारमध्ये मध्यस्थी केली.
कृष्णा नदीला आलेल्या पुरात स्वत: पोहोत जाऊन त्यांनी काही जणांना बाहेर काढले होते. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचलेले मंत्री तेच होते. धुळ्याजवळ महामार्गावर झालेल्या ट्रक अपघाताची माहिती मिळताच तातडीने ते तेथे पोहोचले व त्यांनी जखमीसाठी मदतही सुरू केली होती.
आता इर्शाळवाडीत मध्यरात्री अडीचला सर्व प्रथम पोहोचून मदत कार्य सुरू केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील गिरीश महाजन असल्याचे सांगितले जाते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही विश्वासातील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या इर्शाळवाडीतील मदतीचे कौतुक केले आहे. त्यामुळे युती व महायुती सरकारचे संकटमोचक असलेले महाजन आता जनतेसाठीही खऱ्या अर्थाने ‘संकटमोचक’ असल्याचे म्हटले जात आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.