Jalgaon News : देवळी येथील पैठणी कारखान्यास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात एक शाश्वत रोजगार निर्माण झाल्याने असे उपक्रम ग्रामीण भागात वाढले पाहिजेत. तरुण उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन रोजगार निर्माण करावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केली. (Collector Aman Mittal statement Start employment by taking advantage of schemes jalgaon news)
जिल्हाधिकारी अमन मित्तल, आयएएस अधिकारी अर्पित चव्हाण, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार लाडवंजारी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आत्माचे माजी संचालक अनिल भोकरे यांनी नुकतीच देवळी येथील ज्ञानेश्वरी हॅन्डलूम सिल्क पैठणी कारखान्यास भेट दिली.
विवेक रणदिवे यांनी स्वागत केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी कारखान्याचे संचालक माधव रणदिवे यांनी रेशीम धाग्यापासून पैठणी साडी तयार होईपर्यंतची सर्व तांत्रिक माहिती व विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठेविषयी मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांना दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम धाग्यांपासून पैठणी उत्पादनाबाबत सर्व बारकावे जाणून त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन क्षमता आणि दर्जा कसा वाढवता येईल, यावर मार्गदर्शन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ज्ञानेश्वरी हॅण्डलूम सिल्क पैठणी येथील सर्व महिला विणकरांना आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी तसेच आयुष्यमान योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन दिले. या वेळी त्यांनी विणकर महिलांच्या भावना जाणून घेत ज्ञानेश्वरी हॅण्डलूम सिल्क पैठणी या उद्योगामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक पाठबळ मिळते का नाही? असा प्रश्न विचारल्यावर महिलांनी दिलेल्या होकारार्थी उत्तराने जिल्हाधिकारी सुखावले.
जिल्हा उद्योग केंद्र जळगाव आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया चाळीसगाव यांच्या मार्गदर्शन आणि साहाय्याने चालू झालेले ज्ञानेश्वरी हॅण्डलूम सिल्क पैठणी आणि मैथिली हॅण्डलूम सिल्क पैठणी या दोन उद्योगामुळे परिसरातील ५० महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुभांगी पाटील आणि भूमिका पाटील यांचे कौतुक केले. या वेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.