Collector Ayush Prasad giving certificates to the beneficiaries regarding self-funding. Neighbor Administrator Ravindra Lande. esakal
जळगाव

Jalgaon News : मुख्य वाहिन्यांवरील नळकनेक्शन तत्काळ बंद करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पालिकेने शहरवासीयांच्या आरोग्य व स्वच्छता या दोन महत्त्वपूर्ण बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून योग्य नियोजनासह प्रत्यक्ष काम करावे, तसेच शहराला दिला जाणारा पंधरा दिवसांचा पाणीपुरवठा हा कमी दिवसांवर आणायचा असेल तर मुख्य जलवाहिन्यांवर असलेले नळ कनेक्शन (रायझिंग कनेक्शन) तत्काळ बंद करावे, अशा सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

(Collector Ayush Prasad instructed Close tap connections on main channel immediately jalgaon news)

येथील पालिका सभागृहात पालिकेच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे व विभागातील अभियंता, पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, शहरातील आवास योजनेचे काम दहा डिसेंबरपर्यंत पूर्ण करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.

तसेच दिवाळी सणात शहरातील नागरिकांकडे पैसा उपलब्ध असतो, यासाठी जास्तीत जास्त घरपट्टी, नळपट्टी वसुलीसाठी पालिकेने लक्ष घालून ३१ ऑक्टोबरपर्यंत शहरातील शंभर टक्के वसुली करावी. स्वच्छतेबाबत शहरात जागोजागी योग्य ते नियोजन करून लोकसहभागातून स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करावी. ओला कचरा व सुका कचरा याबाबत योग्य ते नियोजन करून घंटागाडी व कचरा संकलन करण्यासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवावी.

तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी. राजीव गांधी गतिमानता पुरस्कारासाठी पाठपुरावा करून योग्य ते नियोजन करण्याचे आवाहन केले. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कायमस्वरूपी आरोग्यनिरीक्षक नसल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर उत्तर देताना भंबेरी उडाली.

आढावा बैठकीदरम्यान शहरातील महिला जयश्री साळी व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल, असे सांगितले.

तसेच येत्या दोन ऑक्टोबरला शहरातील ५० ते ६० महिलांनी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचित केले. माजी नगरसेवक पी. जी. पाटील यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार केली.

शहरात या योजनेमुळे जागोजागी खड्डे पडले असून, बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार असल्यामुळे हे काम कासवगतीने सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक पी. जी. पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कामासंदर्भात योग्य ते ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिल्यात.

हद्दवाढीबाबत सकारात्मक

आढावा बैठकीत ‘सकाळ’ने वेळोवेळी हद्दवाढीबाबत योग्य ती भूमिका मांडली आहे. मात्र योग्य ती दखल घेतली जात नसल्याबाबद मुद्दा उपस्थित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय साधत हा जिव्हाळ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासित केले.

तहसील येथे आढावा बैठक

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुपारी चारला तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेत तालुक्यातील प्रश्नांची माहिती जाणून घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना देत शेतकरी तसेच तालुक्यातील नागरिक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी योग्य तो समन्वय साधत प्रश्न मार्गी लावण्याचे सूचना केल्यात. स्वनिधीतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर सेवानिवृत्त कर्मचारी विजय शिंपी यांना धनादेश देण्यात आला. चंद्रकांत महाजन यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी पालिकेच्या गणपतीची आरती करत ते जळगावला मार्गस्थ झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT