Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Revenue Officers. esakal
जळगाव

Jalgaon News : महसूल वसुली 100 टक्के करा : जिल्हाधिकारी प्रसाद

जिल्ह्यातील नागरिकांना सेतू केंद्राच्या माध्यमातून वेळेवर सेवा मिळत आहे, ही सकारात्मक बाब आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील नागरिकांना सेतू केंद्राच्या माध्यमातून वेळेवर सेवा मिळत आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र महसुली वसुली मार्च २०२३ पर्यंत शंभर टक्के होणे आवश्यक आहे. भूसंपादनाची सर्व प्रकरणे १५ जानेवारी २०२४ पर्यंत मंजूर करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार ज्येष्ठांच्या तक्रारींची स्वतःहून तत्काळ दखल घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.(Collector Prasad statement of Make revenue collection 100 percent jalgaon news)

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी, महसूल वसुली, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, सेतू सुविधा, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य कार्यक्रम, मनरेगा, भूसंपादन, कूळकायदा, नागरी पुरवठा, अर्ध न्यायिक प्रकरणे, निवडणूक आदी विविध प्रकरणांचा आढावा या बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की जिल्ह्यात महसूल वसुलीचे ४८ टक्के लक्ष्य गाठले गेले आहे. उद्दिष्ट वाढविण्यासाठी महसुलाचे आर्थिक स्रोत ओळखून नियोजन करण्यात यावे. तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यामध्ये पडून असलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात यावा, बिगरशेती आणि शर्त भंग प्रकरणांच्या महसूल वसुलीवर काम करावे. शेतकरी आत्महत्येची प्रकरणे विविध तहसीलमध्ये चौकशीसाठी किंवा आवश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी प्रलंबित आहेत.

सर्व प्रकरणांची चौकशी करून ५ जानेवारी २०२४ पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात यावेत. पोलिसपाटलांची दुसरी फेरी भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी. पोलिसपाटील अॅप आणि पोलिसपाटलांचे प्रशिक्षणाबाबतच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी आढावा घेतला.

बंदूक परवान्यांच्या पुनरावलोकनासाठी सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात यावे, वाळूची अवैध वाहतूक आणि उत्खननात गुंतलेल्या लोकांचे बॉन्ड घेण्यात यावे, बॉन्डचे उल्लंघन होत आहे किंवा नाही याचे पोलिसपाटील, कोतवाल आणि तलाठी यांच्याकडून खात्री करून घेण्यात यावी, सर्व ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वाटप पूर्ण झाले आहे, याची खात्री करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT