Jalgaon news : ‘गुरुपुष्यामृत’ हा सोने-चांदी खरेदीसाठी उत्तम योग मानला जातो. गुरूवारी (ता. २५) गुरुपुष्यामृत असून, सोने खरेदीसाठी शुभमूहर्त असल्याने शहरातील सुवर्ण व्यावसायीकांनी आजच नवनवीन दागीने, लाईट वेट दागीने, कानातील डुल, नथ, बांगड्या, सोन्याचे हार तयार करून शो-रुममध्ये विक्रीस ठेवले आहेत. (combination of opportunity to buy gold by giving 2000 notes jalgaon news)
लग्नसराई व गुरुपुष्यामृत, सोबतच दोन हजारांच्या नोटा देवून सोने घेण्याची संधी असे योग जुळून आल्याने सराफ बाजारात मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोन्याच्या दरात बुधवारी (ता. २४) प्रतितोळा पाचशे रूपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी ६० हजार ८०० रूपयांवर असलेले सोने बुधवारी ६१ हजार २०० रूपये प्रतितोळापर्यंत पोचले आहे.
गुरुपुष्यामृत योगानिमित्त बाजारपेठेत ग्राहकांसाठी सोने-चांदीची विविध आभूषणे विक्रेत्यांनी तयार केली आहेत. विशेष म्हणजे सोने-चांदीचे भाव तेजीत असले, तरी सोन्याची विक्री वाढली आहे. दोन हजारांच्या नोटा घेवून ग्राहक येत असून, त्या बदल्यात सोने घेत असल्याचे चित्र आहे.
अॅन्टिक दागिन्यांना पसंती
इतर कार्यापेक्षा दागिने खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जात असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. त्यानिमित्त सराफा बाजारपेठेतील व्यावसायिकांनी नेहमीच्या दागिन्यांपेक्षा नव्या लूकमधील अॅन्टिक दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. गुरुपुष्यामृत योग निमित्त हे खास दागिने तयार करण्यात आल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वेळही अधिक मिळणार
ग्राहकाच्या बजेटनुसार खरेदीचा कल असतो, त्यानुसार विविध कलात्मक दागिने उपलब्ध करून दिले आहेत. सकाळपासूनच मुहूर्त असल्याने वेळही अधिक मिळणार आहे. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार दागिने तयार केले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार पारंपरिक अलंकारांबरोबरच तुकडा सोन्यासह विविध कलाकृतीतील दागिनेही आणले आहेत. सोन्याचा दर प्रतीतोळा ६१ हजार २००, तर चांदी प्रतीकिलो ७३ हजार (विना जीएसटी) आहे.
"सध्या सुरू असलेली लग्न सराई व गुरूवारी असलेला गुरुपुष्यामृत योग यामुळे सोन्याला मोठी मागणी असेल. त्या दृष्टीने सर्वच प्रकारचे दागीने, लाईटवेट दागीने, सोन्याचे तुकडा, फॅन्सी दागीने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत." -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, बाफना ज्वेलर्स
गुरुपुष्यामृत योगाचे महत्व
गुरुवारी, भगवान विष्णूबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते. ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा योग मानले जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे आणि त्या दोघांमध्ये सामंजस्यही आहे.
शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आजचा सर्वोत्तम दिवस असेल. या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व उपायांनी सर्व समस्या दूर करणे विशेष मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.