Jalgaon Municipality News esakal
जळगाव

Jalgaon Municipality News: शहरात खरेदीसाठी 4 चाकीने येताय! महापालिकेतर्फे आता गल्लोगल्ली पार्किंग सुविधा

दुचाकी पार्किंग सुविधेनंतर महापालिकेने आता चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्तांनी शहरातील वाहनपार्किंसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी संकुलधारकांना धडक कारवाई केली, त्यांनी दुचाकी वाहनांसाठी रॅम्प तयार करून जागा उपलब्ध केली परंतु चार चाकी वाहनांचा प्रश्‍न कायम होता, आता शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या काळात महापालिकेने संडास बोळ म्हणून जागा सोडल्या आहेत.

त्या जागेत आता चार चाकी वाहने पार्किंग करण्याची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली. (coming to town for shopping by 4 wheeler parking facility provided by jalgaon Municipal Corporation)

शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दुचाकी व चार चाकी वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याचे दिसून आले, त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर वाहन पार्किंग करून खरेदीसाठी जात असल्याचे दिसून आले त्यामुळे वाहतुकीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संकुलधारकांनी संकुल बांधले दुकाने बांधली परंतु तळमजल्यावर पार्किंगच्या ठिकाणी दुकाने सुरू केलेल्या दुकानाकडे मोर्चा वळवून आयुक्तांनी त्यांच्यावर सील लावण्याची कारवाई केली, त्यामुळे दुकानदारांनी आता संकुलाच्या तळमजल्यावर रॅम्प करून दुचाकी वाहने लावण्याची सुविधा केली. त्यानंतर त्यांच्या दुकानांचे सील उघडण्यात मात्र अद्यापही काही दुकानांचे सील कायम आहे.

आता गल्लीत पार्किंग

दुचाकी पार्किंग सुविधेनंतर महापालिकेने आता चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी पेठेसह मुख्य बाजार पेठ व वर्दळीच्या भागात जुन्या बोळी आहेत. महापालिकेचा जागा असून अनेक व्यावसायिकांनी या जागा बळकावल्या आहेत.

आताच सील केलेल्या काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या मागे बोळीत जनरेटर ठेवून जागेचा वापर करीत असल्याचे उघड झाले. ही जागाही खाली केली जाणार आहे. त्या ठिकाणी वाहन पार्किंगची सुविधा करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

.... अन्यथा दंड

मोकळी गल्ली अनेकांना बंदीस्त करून त्याचा वापर सुरू केला आहे. काहींनी त्या ठिकाणी गेट करून त्याला कुलूप लावले आहे. या बोळी आता मोकळ्या करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

जर त्या मोकळ्या केल्या नाहीत तर संबधितांकडून दंड आकारला जाणार आहे. अशा जागा कुठे व किती आहेत याची माहिती काढण्याच्या सूचना आयुक्तांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT