jalgaon municipal corporation news esakal
जळगाव

Jalgaon News: सार्वजनिक बांधकाम ‘ना-हरकत’ अटीनुसार कामे करीत नाही : आयुक्त विद्या गायकवाड

शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याची कामे करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याची कामे करण्यात येत आहे. मात्र महापालिकेने दिलेल्या ‘ना-हरकत’ अटीनुसार कामे होत नसल्याचे तयार रस्ते फोडावे लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भुयारी गटारी तसेच अमृत जोडणी झाली आहे. त्याच रस्त्याची कामे करण्याबाबत महापालिकेतर्फे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.

शहरातील रस्ते तयार करण्यासाठी शासनाने निधी दिलेला आहे. ११० कोटी व ८५ कोटीच्या निधीतून ही कामे होत आहेत. मात्र शहरातील रस्त्याची कामे महापालिकेतर्फे न करता ती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. (Commissioner Vidya Gaikwad statement Public works are not working under no harakat conditions jalgaon news)

रस्त्याचे काम झाल्यानंतर महापालिकेला नवीन नळ कनेक्शन तसेच इतर काम करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करावे लागत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे काम झाल्यानंतर महापाकिला रस्त्याचे खोदकाम करीत असल्याचा आरोप करीत मक्तेदारांनेही महापालिकेला पत्र दिले आहे.

आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले कि, ज्या भागात भुयारी गटारी व अमृत योजनेच्या नळ कनेक्शनचे काम झालेले आहे. त्याच भागात रस्त्याची कामे करण्यात यावीत. महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते कामासाठी दिलेल्या ‘ना-हरकत’पत्रात तसे नमूदही करण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या पत्रानुसार कामे न करता आपल्या पद्धतीने कामे करीत असल्यामुळे भुयारी गटारीचे चेंबर्स व नवीन नळ कनेक्शनसाठी रस्ते फोडावे लागत आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या निधीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येणार आहे, यात ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रात दिलेल्या हरकतीप्रमाणे काम करावे, असे कळविण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी भुयारी गटारीचे चेंबर्स व अमृत योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याच ठिकाणी कामे करण्यात यावीत.

३० कोटीच्या रस्त्याची कामे

नियोजन समिती (डीपीडीसी)कडून शहरातील रस्त्याच्या कामासाठी तीस कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून शहरातील रस्त्याची सिंमेट क्रॉंकीट व डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात आले असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. त्यांनी सांगितले, कि तीस कोटीच्या निधीतून ५५ कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.त्यात तीस निविदा पुन्हा काढण्यात आल्या आहेत. सात पुन्हा काढण्यात आलेल्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. मक्तेदारांना वर्क ऑर्डर देवून ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

गाळे भाडेप्रश्‍न सोडविणार

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेभाडे प्रश्‍नाबाबत त्यांनी सांगितले, कि हा प्रश्‍न लवकरच सोडविण्यात येत आहे,शासनाने दिलेल्या अटीनुसार व्यापारी संकुलालगत असलेल्या संकुलातील गाळ्यांच्या रेडीरेक्नर दराची माहिती घेण्यात येत आहे, त्यानंतर पुढील प्रक्रीया लवकरच करून हा प्रश्‍न सोडविण्यात येईल.

सिमेंट रस्ता फोडल्यास साडेसहाहजार प्रतिफूट आकारणी

शहरात रस्त्याची कामे सुरू आहे. तसेच काही जण नवीन नळ कनेक्शनसाठीही अर्ज करीत आहेत. शहरातील रस्त्याची कामे झालेल्या ठिकाणी नळ कनेक्शन द्यायचे असल्यास यापुढे रस्ता फोडण्यासाठी साडे सहा हजार रुपये फूट दराने आकारणी करण्यात येईल.अशी माहितीही आयुक्तांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT