Collector Ayush Prasad during a visit to a plastic company. Jalgaon - Collector Ayush Prasad taking information in a visit to Plastic Company.  
जळगाव

Jalgaon News: प्लास्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर्व प्लास्टिक युनिटसला पुनर्वापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लूमला सबसिडी देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. (Common ETP Center for Plastic Industries jalgaon news)

शुक्रवारी (ता. २९) एमआयडीसीतील तीन प्लास्टिक उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जळगाव जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. प्लास्टिकचा पुनर्वापर या विषयावर चर्चा केली. ओडीओपीअंतर्गत प्लास्टिक उद्योगाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

प्लास्टिक उद्योगात जळगाव मॉडेल तयार करणे, जे प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करेल व जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देईल. जळगावमध्ये जवळपास ४०० प्लास्टिक रिसायकलिंग युनिट्स आहेत.

या युनिट्समध्ये उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्याची क्षमता आहे. यात परवडणाऱ्या दरात ईपीआर अनुपालनाची पूर्तता, पॅकेजिंग उत्पादने, तसेच नॉनपॅकेजिंग उत्पादनांमध्ये वापर करण्यायोग्य प्लास्टिकची निर्मिती करणे, विशेषतः चटई, बादल्या इत्यादींसारख्या ग्राहक उद्योगात आवश्यक असलेल्या उत्पादनांसाठी रिसायकलिंग युनिट्स स्थापित करणे, सरकारी परवाने सुरक्षित करणे, तंत्रज्ञान, वॉशिंग, यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करणे जेणेकरून उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जातील.

पुनर्वापरावर भर

भागधारकाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, की सदस्यांना बोर्डिंग करून सक्रिय सहभाग घेतला जाईल. संपूर्ण उद्योगाच्या ऑनबोर्डिंगसाठी सीएमआयए, एमएएसएसआयए यांसारख्या इतर उद्योग संस्थांशी समन्वय, रिसायकलिंग युनिट्सना परवाने देण्यासाठी एमपीसीबी आणि इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधणे, एमपीएमएच्या मदतीने वर्तुळाकार इकॉनॉमी क्लस्टरच्या यशोगाथेसह जळगाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवू शकते जिथे ७५ हजार अधिक एमटी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्लास्टिक पुनर्वापर करणाऱ्यांसाठी जागरूकता सत्र आयोजित केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT